रात्रीचे सव्वादहा वाजले आहेत.
अर्धा तास विलेपार्ले रेल्वेस्थानकावर राजाभाऊ ट्रेनची व फलाटावर आलेल्या ट्रेनमधे आपल्याला कधी शिरायला मिळेल याची वाट बघत उभे.
आलेली प्रत्येक गाडी माणसांनी ओसांडुन वाहिलेली. दरवाज्यात हवा खात उभे रहाण्याऱ्यांनी निष्कारण दुसऱ्याचे आतबाहेर येणेजाणे चांगलेच अडवुन ठेवलेले.
सोबत "भटकंती " मासीकाची. वाचनात रमल्याने वेळ सुसह्य झालेला.
सोबत "भटकंती " मासीकाची. वाचनात रमल्याने वेळ सुसह्य झालेला.
चार गाड्या सोडल्यानंतर आलेले पाचवी गाडी चांगलीच रिकामी आणि ती देखील नवी.
चला, आता प्रवास चांगला होईल.
गाडी खार स्थानकावरुन सुटली आणि अचानक त्यांच्या डब्यात प्रचंड आरडाओरडा, रडणे, किंकाळ्या, विव्हळणे, बोंबाबोंब सुरु झाली, धडाधड चेन खेचायला सुरवात.
गाडी सुरु होत असतांना चार स्त्रिया सहासात लहान मुलांसह चालत्या गाडीत चढताचढता त्यातील एक बाई व एक मुल खाली पडलेले , फलाटावर पडले की गाडीखाली परमेश्वराला ठावुक.
माणसे किती निष्काळजी असतात.
गाडी मधे कुठेही न थांबता तिने वान्दे स्थानक गाठलेले.
दादर स्थानक आले. काही मिनिटापुर्वी आपल्या समोर एक हादसा झालेला, दुर्दैवी घटना घडलेली याचा जरासुद्धा मागमुस नाही, जो तो आपल्या तालात.
क्षणार्धात सर्वकाही विसरुन गेलेले प्रवासी.
क्षणभंगुर आयुष्याच्या क्षणभंगुर आठवणी.
2 comments:
घटना स्पर्श करुन गेली
खरच माणूस संवेदनाशून्य बनलाय...
Post a Comment