कधी कधी रद्धीवाल्याकडच्या फेरफटक्यात अचानक हाती रत्न लागुन जाते.
मध्यंतरी हाती आतापर्यंत ज्या दिग्गजांची नावे केवळ ऐकण्यात होती, ज्यांचे अग्रलेख अद्यापी वाचले नव्हते अश्या थोर संपादकांच्या अग्रलेखाचे एकत्रीकरण करुन काढलेले "निवडक अग्रलेख " हे पुस्तक हाती पडले. आणि ते ही केवळ पाच रुपयात (दुर्दैव पुस्तकाचे )
यात
"बाळशास्त्री जांभेकर - दर्पण १८३२,
गोपाळ गणॆश आगरकर - सुधारक
बाळ गंगाधर टिळक - केसरी - १९०५
शिवराम महादेव परांजपे -काळ - १९०२
नरसिंह चिंतामण केळकर - केसरी - १९२२
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर -नवाकाळ - १९२३
अच्युत बळवंत कोल्हटकर -
श्रीपतराव लक्ष्मणराव शिंदे -विजयी मराठा १९२२
भीमराव रामजी आंबेडकर - बहिष्कृत भारत - १९२८
कृष्णाजी गणॆश लिमये -ज्ञानप्रकाश
गजानन त्र्यंबक माडाखोलकर - तरुण भारत - १९४६
आनंद कृष्ण वाघमारे - मराठवाडा - १९३८
आदींचे निवडक अग्रलेख आहेत.
3 comments:
> "निवडक अग्रलेख " हे पुस्तक हाती पडले. आणि ते ही केवळ पाच रुपयात (दुर्दैव पुस्तकाचे )
>
खरं आहे. चांगली पुस्तकं न वाचल्या ज़ाता पडली राहून सवंग चित्रपट आणि क्रिकेट पाहण्यात वेळ घालवणार्या समाज़ात पुस्तकांची किंमत घसरणारच.
- नानिवडेकर
शक्य असेल तर पोस्ट करा एक एक ... चांगला संग्रह होईल. पण कॉपीराटस बघुन बरं ...
नानीवडेकर,
गेले कित्येक महिने माझे वाचन जवळजवळ थांबले आहे. फार विचीत्र होत चालले आहे.
विजय,
क्षमस्व. वेळॆअभावी हे सारे कठीण आहे.
Post a Comment