Tuesday, September 30, 2008

उदे गं अंबे उदे! गावदेवी व काळबादेवी

काळबादेवी

गावदेवी



केव्हा केव्हा वाटते देवांचे व देवळाचे पण माणसा सारखे नशीब असते काय ? काही देवळात भाविकांची अलोट गर्दी असते तर काही मधे फारच कमी । मुंबादेवीला तर आज पहिल्या दिवशी अफाट गर्दी होती।

Sunday, September 28, 2008

सुरेख रानफुले फुलली आहेत अगदी परसदारात



सौ.प्रियदर्शनी कुलकर्णी

तीरु लिल्ला तीरु लिल्ला, गाये लता गाये लता, जलेम्बु जलेम्बु.


स्वर्गीय आवाज आज ऐंशी वर्षाचा झाला. 

साऱ्या दुनीयेतील गाणी एक तरफ और दुसरी तरफ "सी. रामचंद्र यांचे झांझर मधे लता नी रुलवलेले 
 
"जी चाहता है दुनीया अब तो से रुठ जाये ओठो पे आ रही है अब मौत की दुवाये
ओ बेवफा जमाने दिल तो लगाके देखा सब कुछ लुटाके देखा 
 
अपना समज के उनको अपना बनाके देखा दिल मे बसा के देखा 
लेकीन मिली वफा के बदले जफाये ओठो पे आ रही है अब मौत की दुवाये 
 
चलते ना तीर बनके दिल ना अगर लगाते धोके मे आ न जाते 
ये दिन न देखते हम आसु नही बहाते दो दिन तो मुस्कुराते
 
घिर घिर के युं ना आती अश्कोभरी जफाये !
 
मग ऐकु लागलो  
 
दिल मेरा तोडा- मजबुर 
सावरी सुरत मन भाई रे पीया तोरी 
बांधी प्रित फुलवर मन लेके चीत चोर दुर जाना ना
हमारे बाद अब - बागी
हाय दिल तोड दिया - मीना बाजार
आंसू अब तु न बहाना- काबीला
न जा न जा बलम- परदेशी
बाजुबंद खुल खुल जाये
मांगने से जो मौत मिलती 
सुबह काइंतजार कौन करे 
मै तुम्हीसे ये पुछती हुं  - बॅक कॅट  
सो गयी चंदनी - आकाश 
भुल सके ना हम और तुम तो जाके भुल गये-  तमाशा 
हाय चंदा गये परदेश - चकोरी 
किसी नजर का मस्त ईशा रा है जींदगी -रागरंग
बेदर्द जमाने से- रिस्ता
दुखियारे नैना - निर्मोही
दिले नाशाद को जीने की - नादान 
मेरे द्वार खुले है - अनमोल रतन 
सपना बन साजन आये - शोखीयां
आंखो मे चीतचोर- मेहमान 
तुझे ओ बेवफा - जिद्दी
खुशी दिलसे गयी - शीशा
तुझे आवाज देती है - हार जीत +
एक ठेस लगी 
अब कौन सहार है 
सून तो लो मेर अफसाना
दिले करार सो जा
उजडी रे मेरे प्यार की दुनीया
घडीया गिनी है मैने
अब कौन सहारा है जब तेरा सहारा छुट गया
प्यार की ये तल्खीया
दिल ही तो है तडप गया
अपना पता बाता दो
कहा तक हम उत्ठाये ये गम
कटती है अब तो जींदगी
आज मेरे नसीब ने मुजको रुला रुला दिया
मेरे लिये वो गमे इंतजार छोड गये
अब गम को बना लेंगे जीने का सहारा  
 
हा असा सिलसीला सारा दिवस सुरु रहाणार आहे
 
आज मी लतामय झालेलो आहे
 
 
लता गाती है बाकी रोते है !!
 
 

सौ.प्रियदर्शनी कुलकर्णी



आज चा दिवस सुरमयी आहे सुरवातच कशी सुरेल झाली,  सौ.प्रियदर्शनी कुलकर्णी यांनी गायलेल्या तोडी, शुक्ल बिलाबल आणि सुकराही या रागांनी.
 
गानतपस्वी मलिक्कार्जुन मन्सूर  यांच्या स्म्रुत्यर्थ आयोजीत "अर्पण" महोत्सवाच्या पहिल्या सत्रात त्यांचे गाणे झाले. 
 
मजा आली.  

Saturday, September 27, 2008

Traveller's Tales: Chennai Snapshots

सर्वोत्तम खाणॆ आणि रहाणे कसे असते हे जर जाणुन घ्यायचे असेल तर या ब्लॉग ला भेट देण्यावाचुन पर्याय नाही. 

Traveller's Tales: Chennai Snapshots: "Saravana Bhavan"

मै सागर की मस्त लहर तु आसमान का चांद

मै सागर की मस्त लहर तु आसमान का चांद
मिलन हो कैसे मिलन हो कैसे मिलन हो कैसे !
 
प्रवासात हे गाणे आठवावे, घरी आल्या वर ते ऐकण्यासाठी सर्व कॅसेंट्स पालथ्या घालाव्यात पण ते सापडु नये. 
 
हाय यह कैसी अवस्था है !
 
वसंत देसाईंनी संगीत बद्ध केलेले व लता नी अजरामर केलेले हे गाणॆ ऐकायला मिळत नाही तो पर्यंत ही बैचैनी अशीच सतावत रहाणार. 

दुसरे आवडते गाणॆ म्हणजे रोशन नी संगीतबद्ध केलेले रागरंग चित्रपटातील

यही बहार है दुनीया को भुल जाने की खुशी मनानेकी यही घडी है जवानीकी गुनगुनानेकी मुस्कुरानेकी ! ये प्यारे प्यारे नजारे ये ठंडी ठंडी हवा ये हल्का हल्का नशा ये काली काली घटांयोंकी मस्त मस्त अदा ये कोयलोंकी सदा! निकल के आ गई रुत मस्तीया लुटानेकी झुम जाने की

गायीका अर्थात लता.

खैरलांजी हत्याकांड

खैरलांजी हत्याकांडातील निरपराध बळी पावलेल्यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना न्याय मिळाला.

गुजरात मधे दंगलीत बळी पावलेले, होरपळलेले निष्पाप जीव अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

Friday, September 26, 2008

युवा राष्ट्रकुल स्पर्धा - पुणे

होतील हो , सर्व काम वेळे आधी पुर्ण होतील , काय घाई आहे। स्पर्धेला अजुन तसा अवकाश आहे ना । उगीचच आधी पुरी करुन करायचे काय ? स्पर्धेच्या वेळी सगळे कसे नवे कोरे चकचकीत दिसायला नको का ? नाहीतर सर्व कसे जुनाट वाटेल , जग मग कसे भारावुन जायेल ?
लोकांना समजत नाहीय की अडथळ्याची शर्यत महामार्गावर ठेवली आहे । स्पर्धकांना लांब उडी मारण्यासाठीच मुद्दामुन खड्डे रस्तात ठेवले आहेत ।
आता काही जण म्हणतात सर्विस रोड चे काम पुरे व्हायचे आहे, बाणेर ला जाणारा रस्ता दुरुस्त व्हायचा आहे , बाले वाडी जवळील उड्डान पुलाचे काम फार रेंगाळय, बाजुलाच ऑर्चिड चे इमारतीचे काम चालले आहे, पण या साऱ्या उगीचच्च्या काळज्या आहेत। दोष दाखवण्याची सवयच काही जणांना असते त्यातला हा प्रकार ।

Wednesday, September 24, 2008

लग्नाचे जेवण श्रुती मंगल कार्यालयात जेवण्यासारखे सुख नाही

आयुष्यात अनेक मंगल कार्यालयात विवाह आदी निमित्ते जाण्याचा योग येतो, जेवण जेवले जाते, पण घरी आलो की आपण काय जेवले होतो ते विसरले जाते, त्यात लक्षात ठेवण्यासारखे काहीच नसते.
 
याला अपवाद फक्त दोन मंगल कार्यालयाचा. एक पुण्यामधील श्रुती मंगल कार्यालयातील व दुसरा सांगलीतील खरे मंगल कार्यलयातील जेवणाचा. 
 
लग्नाचे जेवावे तर येथेच. 
 
श्रुती मंगल कार्यालयात लग्नाचा दिवशी जे जेवण मिळते त्या पेक्षा आदल्या रात्री जे काही जेवण मिळते ते जास्त स्वादिष्ट असते असे माझे प्रामाणीक मत आहे. बेस्ट  इन द होल वर्ल्ड.  प्रत्येक वेळी ते मी खुप एन्जॉय केलय.  त्यात अळू चे फदफदे असेल तर मग काय. राजाभाऊ खुश.      

Monday, September 22, 2008

सनी दा ढाबा - फाय स्टार रेट थर्ड रेट शाकाहारी जेवण

काल मुंबई पुणे हमरस्तावरील कामशेत जवळ असलेल्या सनी दा धाब्या मधे जेवणाचा योग आला । पस्त्तवलो। मांसाहारी , सामिष जेवण करणारी माणसे येथे अगदी आनंदाने जेवत असतील पण माझ्या साठी मात्र ही शिक्षाच होती। खर म्हणजे जेथे मांसाहारी , सामिष जेवण मिळते तेथे जाण्यास मी स्पष्ट नकार देयाला हवा , माझा मुळे इतरांचा नाहक विरस होतो।
मसालेदार, तेलकट महागडे जेवण । आज मुलगा आजारी पडलाय । रेट तर काय विचारु नकात। ढाबा म्हणजे हमरस्तावरील स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याची जागा ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे।

Sunday, September 21, 2008

भाद्रपदातील पाऊस मस्तय

मुंबई-पुणे प्रवासात आता मागे पडलेले वाचन पुन्हा सुरु करायचे हा निश्चय करुन एखादे पुस्तक सोबत घेतो, पण ते न वाचताच परत घेवुन गेले जाते. या दुष्टाव्याला कारणीभुत आहे तो निसर्ग. 
 
एकदा का कल्याण सोडले की तो जो साथ देत रहातो ते नुसते पहात रहावेसे वाटत रहाते.
 
श्रावणातील पावसाचे कौतुक फार होते पण मला यंदा भावला तो हा भाद्रपदातील पाऊस. 
 
काय घाटात धबधब्यांचे पिक आलय. एका पेक्षा एक सरस.  पुणॆ जसजस जवळ यायला लागते तसे तसे नविन नविन फुललेली रानफुले मन प्रसन्न करत रहातात.  

तारे जमीं पर


मग काय  निकुंभ मास्तरांची आता ऑस्कर मधे परिक्षाच आहे म्हणायची. 

All the best,  तारे जमीं पर चित्रपटाचा सर्व टिम ला. यशस्वी होवुन या.  आम्ही त्या सोनेरी क्षणाची वाट पहत आहोत. 

 

Saturday, September 20, 2008

आशा डायनींग हॉल - शिवराक भोजना करता

विस्म्रुतिच्या कप्पात गेलेले एक नाव आज अचानक मनात वर उभारुन आले. आशा डायनींग हॉल. किती तरी वर्षे झाली असतील याला भेट देवुन. पुर्वीच्या काळी आम्ही जेव्हा आपटे रोड, पुणॆ येथे नंदनवन मधे उतरत होतो तेव्हा कधी तरी या ठिकाणी भोजन करावयास जात असु.
राजाभाऊंच्या मनी एखादी गोष्ट आली की मग काय ! त्यात जेव्हा जेव्हा याचा संबंध डायरेक्ट पोटाशी असतो तेव्हा तर त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाते , मग काय सपत्नीक राजाभाऊ पोचले आपटे रोड वरील धनराज सोसायटीत.
हे काय आत प्रवेश केल्या नंतर चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले , ते छोटॆखानी बैठे घर गेले कोठे ज्यात आशा डायनींग हॉल चा कारभार चालायचा. आता त्याची जागा एका बहुमजली इमारतीनी घेतली आहे. पहिल्या मजल्या वरील नवीन रुपातील "आशा" बघुन खुप बरे वाटले, आता ही जागा मस्तच झाली आहे.
श्री. किणी यांचे हे भोजनगृह कारवारी पद्धतीच्या उत्कॄष्ट जेवणासाठी सर्वोत्तम आहे. आज खासा बेत होतो, पहिल्यादाच ही भाजी मी चाखली. मंगोलरी काकडी ची भाजी, केव्हा तरी ती खास करतात, मस्त लागली.
ताटात चवळीची रस्सेदार भाजी, बटाटयाची कापाची भाजी, आमटी, भात, रसम, गाजराची कोशींबीर, चटणी , आणि ते देखील हवे तेवढे मुबलक, अमर्यादीत. राहुन राहुन वाढपी सतत वाढायला येत होते, वाढत होते, हातचे न राखता. परत हे सर्व फक्त ५० रुपयात आणि ते पण या महागाईच्या दिवसात !
मजा आली. दिल खुष हुवा.

ऑटोरिक्षा चालकांनी आपल्या रिक्षावर त्यांना कोठे जायचे आहे याचा बोर्ड लावावा

शिवाजीनगर रेल्वेस्थानक परिसरात उभा असणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांनी आपल्या रिक्षावर त्यांना कोठे जायचे आहे याचा बोर्ड लावावा. प्रवाश्यांचा "त्यांना येणार का ?" विचारत बसायचा त्रास तरी वाचेल.
दहा जणांना विचारत फिरायचे व त्यांची नकार घंटा ऐकत पुढे जायचे त्या पेक्षा हे बरे.

माय लिटील कथ्थक डान्सर





आज काकाच्या डोळ्यात आनंदाश्रु आहेत.

 काका "मला माय लिटंल प्रिंन्सेस बोलु नकोस, मला माय लिटील कथ्थक डान्सर बोल" - इती माझी पुतणी. 
 
पुतणी साठी गुरुंचा शोध तिच्या या काकानीच लावला, चांगले गुरु लाभायला गे भाग्य लाभते ते तिच्या नशिबी नक्कीच होते. 
 
हि तर केवळ सुरवात आहे. 
 
 
 
 
 

सत्तरीचा म्हातारा जेवण शिजवतो

भटकंतीत अनेक वेळा एखादी अप्रतीम जागा आपल्याला सापडुन जाते , आपल्याला तॊ एवढी आवडते की आता परत परत या जागी यायचेच यायचे असे आपण आपल्या मनाला सतत बजावत असतो. 
 
पण परत काय तिथे जाणे होत नाही. पण त्याच्या आठवणी मात्र तश्याच आयुष्यभर ताज्या रहातात. 
 
असेच पावसाळ्याचे आम्ही निघालो पदभ्रमणाला. कर्जत जवळील एका गावात आमच्या मित्राच्या फार्म हाउस वर रात्री मुक्काम करुन भल्या पहाटे सुरवात केली चढाईला. लक्ष होते कुसुर,  आंब्याचे पाणी घाट चढुन वरती गेल्या नंतर आंध्रा तलावाच्या काठाकाठाने वाट वरती कुसुर ला चढते. धबाबा पाउस कोसळत होता. 
 
अत्यंत नितांत देखणा असा हा परिसर, वरती पोचलो तेव्हा अगदी चांगलेच दमुन गेलो होतो. दमले नव्हते ते केवळ आमच्यातले सर्वात तरुण , सत्तरीचे नाना नित्सुरे. कारण त्यांचे  काम आत्ता सुरु झाले होते, स्वयपाकाचे. दमलेभागलेल्या आम्हा म्हाताऱ्यांच्या पोटी,  या गारठयात गरगागरम अन्न पडावे याची व्यवस्था करण्याची.
 
 
थकल्याभागल्या जिवाला मिळालेल्या, चुलीवर शिजलेल्या गरमागरम आमटी भाताची चव, नानांच्या हातची चव अजुनही जिभेवर रेंगाळते आहे.       

Thursday, September 18, 2008

का बरे असे

अनेक वेळा एखाद्या माणसाबद्द्ल आपण ऐकुन असतो, त्याचे साहित्य आपण वाचलेले असते, त्यांच्या बद्दल भरभरून आलेले लेख वाचलेले असतात । त्यांच्या बद्दल आपल्याला फार आदर असतो, त्यांना भेटायची इच्छा असते । भेट होतेही ।
पण प्रत्यक्ष भेटीत आपण निराश होतो, त्या व्यक्ति विषयी भ्रमनिरास होतो , आपल्या मनातील त्यांच्या प्रतिमेला तडा जातो, स्वप्नातील , कल्पनेतील व्यक्ति व व्यवहारातील ते पाहुन वाटते हे आपल्याला भेटले नसते तर बरे झाले असते।

असाही एक गणेश भक्त


राजे, चामडे आणि पेव्हर ब्लॉग



चप्पल , बुटाच्या जन्मा बद्दल एक गोष्ट सांगीतली जाते। पुर्वीच्या काळी लोक अनवाणी फिरत असत , एकदा राजा असाच फिरायला निघाला असता त्याच्या पायाला चिखल माती लागली , संतापल्या राजाने संपुर्ण राज्य भर रस्तावर चामडे हातरायचा हुकुम सोडला , आता राजाची आज्ञा मोडायची कशी ?


मग प्राणी मारणे, त्यांचे चामडे कमवणे व रस्तावर आंतरणे सुरु झाले, लोक त्रस्त झाले ।


एकाने शक्कल लढवली , पायताणे तयार करून राजाला भेट दिली , राजा खुश , प्रजा खुश ।


काळ बदलला, राजे बदलले , चामड्याची जागा पेव्हर ब्लॉग ने घेतली।

Monday, September 15, 2008

गौराई



बहुतेक सर्वच ठिकाणी गणपतीपुढे आरस केली , सजावट केली जाते, भक्त जन या सजावट करण्यात गुंगावुन जातात, दंग होतात।
मग येते ती माहेराला गौरबाई. पण बिचारीची प्रतिस्थापना तेवढ्या थाटामाटात होतेच असे नाही.
अपवाद माझे स्नेही श्री. सावे यांच्या कडे। त्यांच्या पत्नी, सौ उल्का सावे यांची हौस मोठी दांडगी। त्यांनी केलेली ही देखणी सजावट पहाताना भान हरपते।

Sunday, September 14, 2008

उपेक्षीत राहीले्ली पथके


या गणॆशोत्सवात, मिरवणुकीत काही जण दुर्लक्षीत रहातात, ते म्हणंजे अहोरात्र मिरवणुकीपुढे वादये वाजवणाऱ्या पथकातील माणसे. बिच्चारी वाजवुन वाजवुन दमत कशी  नाहीत. कोणते बळ त्यांना या दिवसात प्राप्त  होत असावे ? 

वाद्यांचा महा प्रचंडा कल्लोळ ऐकणाऱ्यांच्या कानात दडे निर्माण करत असतो, यांच्या, या वाजवणाऱ्या कानांवर त्याचा काही तरी कायम स्वरुपी परिणाम होतच असणार की.    

नवी दिल्ली मधील भ्याड माणसांनी केलेले बॉब स्फोट

 खरच काय साधते या अतिरेक्यांच्या दहशदवादी कारवायांनी ? 

आता पर्यंतचा इतिहास पाहीला असता दहशदवाद्यांचे  कोणतेही दिर्घकालीन उद्दी्ष्टे या अतिरेकी मार्गानी साध्य झालेली नाहीत, असे असता  निरपराध मा्णसांना मारुन यांना काय मिळते ?

Saturday, September 13, 2008

सारे काही केवळ पोटासाठी

नगरकर तालीम

नवग्रह मित्र मंडळ

तुळशी बाग

बाबु गे्नु मंडळ

मोहाला किती वेळा शरण जावे ?


काल मंडईत गेलो असता नजर गेली ती भुईमुगाच्या टपोरी, दाणॆदार, भरल्या तजेल्या, शेंगांच्या ढिगाऱ्यावर आणि मनी लालसा निर्माण झाली. 
अतिशय गोड दाणा, त्यातल्या अर्ध्या तर रस्तातच संपल्या कच्या खाण्यात. या अश्या शेंगा भाजुन खाण्यात काहीच हशील नाही. त्यांचा योग्य तो मान ठेवलाच गेला पाहीजे. 
 
आजचे सकाळचे पावसाळी धुंधफुंद, गारेले, मदहोशी वातावरण, सोबतीला हव्या त्या वाफलेल्या भुईमुगांचा शेंगा. चांगल्या स्वच्छ धुवुन त्यावरची माती बाजुला केली, मग त्या कडेस किंचीतश्या फोडुन , मस्तपैकी खारेसे पाणी आत जाण्याची तजवीज केली, मग त्या झक्कास पैकी वाफल्या ( अर्थात हे सारे तिने केले, खाण्याचे काम माझ्या कडे ) 
 
खातांना या हातांनी फोडायच्या नाहीत, दांतांनी हळुवार पणे त्यावर किंचीतसा दाब दयावा, स्सरकन खारट पाणी बाहेर येथे ते चोखावे, मग अलगद आतले दाणे बाहेर काढुन त्याचा आस्वाद घावा अगदी पोट गच्च भरेस्तोवर.    

Friday, September 12, 2008

तो मी नव्हेच . या मुलाचा बाप कोण ?

गुरुजी तालीम

मंडई

दगडु शेठ गणपती - पुणॆ


बेडेकर मिसळ, पुणॆ -कुछ खास दम नही !



बऱ्याच वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या मागे ती प्राप्त करण्यासाठी धावत असतो, पण ती मिळाल्याला वर जाणवते, फुस्स , बंडल, उगीचच आपण या साठी अट्टाहास करत होतो.
 
कित्येक वेळा आम्ही बेडेकरांकडे मिसळ खायला गेलो असु, दर वेळी काही ना काही कारणाने ते दुकान बंद असलेले आढळुन यायचे.  गेल्या वेळीस काय तर "आमच्या कडे पाणी संपले असल्यामुळे दुकान बंद राहील " आता ही पाटी बघुन हसु का रडु ?.   
 
पणं मी ही तसा जिद्दी माणुस ते जर दुकान बंद ठेवतांना दमत नसतील तर मी तरी का दमु. केव्हा ना केव्हा तरी ते दुकान उघडे मिळेल की.   
 
पण आज गणराय पावले म्हणायचे, दुकान चक्क उघडे होते. आनंदाने मिसळ खायला मागितली.
 
लेकीन कुछ  बात बनी नही. अजीबात मिसळ आवडली नाही. नुसती तिखट , त्यांत वांग्याने भरलेला रस्सा, भरपुर शेव मारलेली. नशीब दोघां मिळुन एकच मिसळ मागीतली होती.
 
त्यात वाईट गोष्ट म्हण्जे ज्या कळकट, मळकट , घाणेरडया फडक्याने टॆबले पुसणाऱ्या माणसांने त्याच हाताने आम्हाला पावाच्या स्लाईस आणुन दिल्या, फोटो काढण्याच्या नादात जाणावले नाही , पण खाल्या नंतर अश्या बाबी हमखास आठवतातच.   
 
यांच्या पेक्षा श्रीकॄष्ण मिसळ कैक पटीने सरस आहे.  

प्रितम मेरी दुनीया मे दो दिन तो रहे होते

प्रितम मेरी दुनीया मे दो दिन तो रहे होते
प्रेमकी सागर मे एक साथ बहे होते !

अगर मुझसे बिछडना तुझे ओ जालीम
दो बोल मुहब्बत के हमसे ना किये होते !!

काल अचानक पुणॆ प्रवासात मदन मोहननी स्वरबद्द केलेले व लतानी आपल्या दर्दभऱ्या आवाजात गायलेले हे गाणे आठवले व बैचैनी वाढली. आता हे गाणे डोक्यात गरागरा फिरुन राहीलय.

आता हे गाणे ऐकल्याशिवाय मन शांत होणार नाही. कोणात्या कॅसेट मधे आहे कोण जाणॆ, शोधण्याचा आलाय कंटाळा.

लाडु सम्राट नव्हे हा तर वडा सम्राट !



बटाटा वडा खावा तर येथेच नाही तर खाऊ नये. अशी ख्याती असलेले हे "लाडु सम्राट" नामक उपहारगृह नव्या देखण्या रुपात नटुन परत एकदा जातीच्या खव्वय्यांची क्षुधाशांती करण्यासाठी, त्यांना तॄप्त करण्यासाठी सज्ज झाले आहे.


काही महिन्यापुर्वी या उपहारगॄहाची अवस्था फारशी चांगली राहीली नव्हती, कापे गेली नी भोके राहीली सारखी अवस्था झाली होती, आता या ठिकाणी परत पाऊल टाकायचे नाही ही माझी भिष्मप्रतिज्ञा , ज्या रितीने लाडु सम्राटने कात टाकली, फिनीक्स पक्षा प्रमाणॆ भरारी घेतली ते पाहुन कधी "बटाटा वडयात " बुडली हे कळलेच नाही.

ऐन मराठी वस्तीत, वेल, निदान कोणे एके काळी संपुर्ण मराठी माणसे रहात असलेल्या या मराठी गाभ्यात, लालबाग मधे, बटाटा वडा, वडा उसळ, मिसळ, साबुदाणा वडा , कोथिंबीर वडी, अळुवडी, थालीपिठ, पोहे, खरवस खाण्यासाठी लाडुसम्राट मधे जाणॆ हे मराठी माणसांनी अजीबात टाळु नये. टाळलत तर बटाटा वडा कसा असु शकतो, कसा असावा हे कधीच कळनार नाही.

खातच रहाल, खातच रहाल. खातच रहाल.

आता राहीले केवळ पाहण्यापुरते


दणका


देवनागरी लिपीत संपुर्ण नावाची पाटी। आंग्लंभाषेतील पाटी गायब

सुर्यमहाल ठाकुरद्वार


Monday, September 08, 2008

भाषा वाद - विसंवाद ते सुंसंवाद

परवा काही अमराठी माणसांबरोबर माझी मैत्रिपुर्वक चर्चा झाली। मी त्याना सांगत होतो की "आपण ज्या प्रांतात, प्रदेशात, राज्यात, देशात रहातात त्या तिथली स्थानिकांची भाषा आपण अवगत करायला हवी, शिकायला हवी। त्यांच्याशी नुसताच संवाद करण्यासाठी नव्हे तर सुंसंवाद साधण्यासाठी

त्याना हे पटत नव्हते, आमच्यावर कोणीही दुसरी भाषा शिकण्याची जबरदस्ती करता कामा नये । काही जण म्हणु लागली , आम्ही फिरती वर असतो , शिकुन काय करु ?

पिढ्यानपिढ्या आपण जेथे रहातो त्याप्रदेशाची भाषा शिकुन घ्यावी असे यांना कधीच वाटत नाही ? अगदी थोड्या अवधी साठी आपण परक्या प्रदेशात, देशात गेला असाल तर गोष्ट वेगळी ।

मुंबई सारख्या शहरात जे रहातात त्यांचे एकवेळ चालु शकते , पण ज्या प्रांतात दुसरी कोणतीही भाषा बोलली जात नाही, नकळतपणे, मुद्दामुन , आडमुठेपणे, किंवा खरोखरीच कळ॑त नसल्यामुळे, त्या ठिकाणी आपण कसेकाय टिकाव धरून राहु शकाल ? त्याशिवाय आपण दैनदिंन व्यवहार कसे काय पार पाडणार । प्रत्येक पावली आपल्याला स्थानिकांशी संपर्क साधावा लागतो , तो आपण कसा साधणार? खाणाखुणा करून की चित्रे काढुन ? की स्वताला घरात कोँडून घेवुन ?

आपण जेथे स्थायिक होतो तेथल्या रितिरिवाजांशी, संऋतीशी आपण समरस व्हायलाच हवे , स्थानिकांशी एकरूप व्हायलाच हवे , आणि हे केवळ आपल्याच साठी असते।

आपल्याला काय वाटते ? जरुर आपली मते येथे नोंदवा।

तसेच परदेशात
आपण स्वताला त्यांच्या भाषेत कसे काय जमवुन घेतलेत , या बद्द्लचे आपले अनुभव जरुर आपल्या ब्लोग वर लिहीणे।