आजचा दिवस चांगलाच स्मरणात रहाणार आहे. आज आगळीवेगळी भेट मिळाली, सहचारणीकडुन. लग्नाच्या वाढदिवसा निमीत्ते.
प्रियजनांसमवेत कलेचा आस्वाद घेण्यासारखे सुख नसावे. याज ते लाभले या निर्दयी प्रीतमला.
बायको चक्क आनंदाने सोबत आली श्रीमती नंदीनी अशोक यांच्या श्री पवित्र आट्र्स अकादमी ने २६ व्या आंतरराष्ट्रीय नॄत्य दिवसाच्या निमीत्ते आयोजीलेल्या नॄत्य महोत्सवाला.
मेरे तो भाग खुल गये. किस्मत का दरवाजा समझो य़ु खुल गया.
त्यात परत नॄत्यांगना माझ्या आवडीच्या. मग काय विचारता.
सर्व प्रथम जयाप्रिया विक्रमन यांनी कुचीपुडी हा नॄत्यप्रकार सादर केला. मग आल्या त्या डोना गांगुली व त्यांच्या शिष्या. ओडीसी सादर करण्यासाठी. वाहवा, क्या बात है. महषासुरमर्दीनी संबधी नृत्य. दिल खुष हुवा. त्यांचा कार्यक्रम गेल्यच वर्षी येथेच म्हणजे नेहरु सेंटर मधे झाला होता, तो बघितल्या पासुन पुनर्प्रत्ययाचे वेध लागले होते. आज योग जुळुन आला.
त्या नंतर मग श्रीमती नंदीनी अशोक आणि त्यांच्या शिष्या.
शेवट पर्यंत काही थांबता आले नाही. हरकत नाही. जे काही मिळाले तेही नसे थोडके.
No comments:
Post a Comment