Sunday, April 27, 2008

कुहुक कुहुक करे रे कारी कोयलीया


आज तो मेरे भाग खुल गये ! श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे व पं. संजीव अभ्यंकर यांचा बहुचर्चीत जसरंगी जुगलबंदी अर्थातच सहगायनाचा कार्यक्रम ऐकण्याचा मणीकांचन योग अखेरीस जुळुन आला आणि तो ही एनसीपी च्या टाटा थेटर मधे. गाणे ऐकायचे तर ते येथेच. नाही तर ऐकु नये.

गाण्याला जायला निघालो आणि शुभशकुन झाला. बहरलेला. फुलांच्या गुच्छाने लगडलेला सीता अशोक अकस्मात समोर आला, तोही कार्यालयाच्या अगदी जवळ असलेल्या योगक्षेमच्या इमारतीच्या आवारात. युसलेस माणसा, कर्मदळीद्री माणसा, काय करत काय होतास आजन्म ? नजर तुझी नक्की कोठे असायची? सरत्या आयुष्याच्या काळात त्याचा आढावा घेण्याची बुद्धी सुचलीच तर मला आपण ऐकलेल्या मैफीली व त्यात श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे, विणा सहस्त्रबुद्धे, उल्हास कशाळकर, मुकुल शिवपुत्र यांचे कार्यक्रम नक्कीच याद रहातील.

वातावरण निर्मीती. या साठी आधी दोघेही वेगवेगळे गायले. अश्विनीताई गायल्या यमन व चैती. त्यांच्या नंतर संजीवजी गायले रागेश्री व होरी.

मग बारी होती सहगायनाची. बंदीश एक, पण एकाच वेळी ते दोघेही वेगवेगळ्या रागात ती गाणार.

श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे नी सुरवात केली ललीत रागाने व त्यांच वेळी संजीव अभ्यंकर गावु लागले राग पुरीया धनश्री. त्या नंतर अभोगी व कलावती. शेवटी एक भजन.

नाही म्हणजे थोडासा वैचारीक गोंधळ उडायचा होता तो उडलाच. हे असे काही ऐकायची प्रथमच वेळ होती ना.

2 comments:

शर्मिला said...

मुंबईमधले हिरवे पट्टे कोणकोणते पाहीलेत आत्तापर्यंत मग? त्याबद्दलही लिहा एकत्र एखादं पोस्ट. अशोकाचं वर्णन खूप छान केले आहे तुम्ही आधीच्या पोस्टमधे. सीताअशोक म्हणतात तो हाच कां? मुंबई युनिवर्सिटी कॅम्पस (टाउन मधल्या. कलिनाच्या नव्हे.) मधली झाडे पण खूप सुरेख आहेत. हे अशोकाचेही झाड आहे तिथे. शिवाय कदंब, उर्वशी ची दुर्मिळ झाडे सुद्धा आहेत. बीपिटी गार्डन, फ़ाइव्ह गार्डन पार्सी कॉलनी परिसरात सुद्धा फार छान अव्हेन्यूज आहेत झाडांचे. शिवाय मलबार हिल आणि जिजामाता उद्यानातली झाडेही कोणत्याही मोसमात पहाण्यासारखी असतात.

HAREKRISHNAJI said...

शमा,

धन्यवाद. मी मुंबईत नव्हतो त्यामुळे सगळाच गाडं अडलय. सीता अशोक हाच. ज्याची गल्लत बहुतेक सगळॆच रस्तात सर्वत्र आढ्ळणाऱ्या , सरळ्सोट वाढणाऱ्या अशोक वॄक्षाशी करतात. हा खुप बहुगुणी व याचे फार औषधी गुणधर्म आहेत.
मुंबई युनिवर्सिटी कॅम्पस अगदी माझ्या कार्यालयाच्या समोर असल्यामुळे, अतीपरीचयाने दुर्लक्षीत राहीलेले आहे. जरुन तेथे व इतर ठिकाणी फेरफटका मारीन. हे अशोकाचे झाड बीपिटी गार्डन किंवा सागरी उपवनात शिरल्याबरोबर उजवी कडे आहे.