
भारतीय क्रिकेट संघाने काल आपला ४२ धावांचा निचांक मोडण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. पण दुर्दैवाने तो केवळ ३४ धावांच्या मुळे फसला. जर का हा यशस्वी झाला असता तर जागतीक क्रिक्रेट संघाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी हा क्षण नोंदवला गेला असता, आपल्या संघाच्या शिरपेचात मनाचा एक नविन तुरा रोवला गेला असता. एक चांगला प्रयत्न म्हणुन याची नोंद होवु शकते.
माझ्या मते भारताने नविन विक्रम करु नये या मधे नक्कीच परकीय शक्तींचा हात असावा.
किंवा कदाचीत कमीत कमी म्हणाजे २० षटक खेळाण्याचा हा नवा विक्रम असावा. तसे असेल तर अभिनंदन.
(फोटो . दै. सकाळ मधुन )
3 comments:
:)......
जाऊद्या हो! कशाला एवढे मनाला लावून घेता? पैसे मोजण्यात दंग असल्यामुळे खेळाकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे?
प्रिय, पि.के.
अस कस म्हणता ? आता क्रिकेट म्हणजे आपल्या भारतीयांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे ना !
Post a Comment