Thursday, April 03, 2008

एका वेदनाशामक मलमाची जाहीरात. सुमसान रस्ता, एकही चीटपाखरु नाही . एक गॄहस्थ समोरुन चालत येत आहेत, अचानक मधे थांबतात, त्यांची नजर पायाजवळ रस्तावर पडलेल्या ५०० रुपयाच्या नोटे कडे जाते. अचानक धनलाभ. पण ! काय करु ? कशी ही नोट उचलु ? ही जन्माचीच पाठदुखी मागे लागली आहे ना. वाकताही येत नाही. हळहळत ते सदगॄहस्थ पुढे निघुन जातात.

आपल्या ही आयुष्यात बऱ्याच वेळा ही पाळी येते. कारण आपण फक्त दोन पर्यांयाचा विचार करतो, त्याही पलीकडे शक्यता असु शकते याचा विचार करायला आपल्याला फारसे कोणी शिकवले नसते. गुढग्यात वाकुन , आपण उठयाबश्या काढतो तसे वाकुन खाली बसुन ते ती नोट उचलु शकत होते की.

पण नाही.

पाठदुखी. खाली वाकता येत नाही. वाकावे की वाकु नये ? बस्स फक्त दोनच पर्याय. नुकसान आपलेच.

दुसरी एक आर्युविमाची जाहीरात.
मुले , आई , वडील. स्केटींग करायला निघाले आहेत. व सोबत आजी आजोबा. मोठया कौतुकाने आजी आजोबांच्या पायी स्केटस चढवतात, अर्थात सुरक्षेततेची सारी काळजी घेवुन, डोक्यावर शिरस्त्राण, ढोपरावर, हाताच्या कोपऱ्यावर गार्ड चढवलेले. असेच आम्ही तुमची काळजी घेतो हा संदेश.

तरी पण मला वाटते या वयात, म्हातारपणी हे साहस करणे टाळायला हवे. कुठे धडपडले, पडले, लागले, हाड मोडले तर कठीण परिस्थीती निर्माण होवु शकते,

म्हातारपणात अस्थीभंगामुळे काय काय होवु शकते याचा अनुभव गेले पाच- सहा वर्षे आम्ही घेतो आहोत.

1 comment:

कोहम said...

Harekrishnaji.....srilanka khup changali jaga aage. jarur trip kadha....fakta tyancha civil war cha status baghun magach nakki kara.....me hoto teva yudhdhabandi chalu hoti.....pan loka ani jaga ekadam jhakaas aahe ani farashi mahagahi nahi....