Saturday, April 05, 2008

"सजन मिलाप" - जाते हो तो जावो । हम भी यहां यादोंके सहारे जी लेंगे ॥

आज मन खुप दुःखी आहे. यंदाचा गुढी पाडवा जीवाला चांगलाच चटका लावुन जाणार आहे. वर्तमान पत्रात वाचलेला लेख व जाहीरात की काळजात घुसलेली कट्यार ?

या मंगल क्षणी "सजन मिलाप" आपला अंतीम कार्यक्रम सादर करणार आहे. "आग्रा गायकीत गायल्या जाणाऱ्या निवडक बंदिशी" सहभाग श्री. राजा मियॉ , श्रीमती ललिथ राव.

गेली ३२ वर्ष, गीता मंदीर हॉल, भारतीय विद्या मंदीर, चौपाटी येथे सजन मिलाप या संस्थेने सातत्याने दर्जेदार शास्त्रीय संगीताच्या बैठकी सादर केले. अनेकांना मी गेलो पण बहुतेक मैफीली माझ्या नेहमी प्रमाणेच हुकल्या. जवळची कुणी व्यक्ती जाणे व एखादी जिव्हाळ्याची संस्था बंद होणे दोन्हीचा शोक सारखाच.

असे काय झाले असेल की सजन मिलाप ही संस्था आपला हा उपक्रम बंद करत आहे ?

जाते हो तो जावो
हम भी यहां यादोंके सहारे जी लेंगे.

सारे रसीक यंदाच्या नव्या वर्षा ला खुप काही तरी गमवणार आहे.


No comments: