महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष नाहक कोकलत राहीले आहे, निकाल लागुन येवढे दिवस झाले तरी अजुन सरकार स्थापन होण्याची लक्षणे काही दिसत नाहीत.
त्यांना दिसत नाही काय सर्व नेतेगण किती व्यस्त आहेत ते, आपला अतिथिधर्म पाळण्यात.
हे जागावाटपाचे, खातेवाटपाचे काय केव्हाही फुरसत मिळाली की बघता येइल, सरकार वेळ आली की राज्याला मिळेलच, जाते कुठे. पण आलेल्यांची सेवा उत्तम रितीने व्हायलाच पाहिले, त्यांची कॄपादॄष्टी असेल तर एकदा काय दोनदा काय, अनेक वेळा पॉवर मिळेल.


