Wednesday, September 14, 2022

बारबेक्यु नेशन

आज दुपारचे जेवण "बारबेक्यु नेशन " मधे.

शाकाहारी माणसांसाठी हे बारबेक्यु नोहे करत राजाभाऊ येथे स्वखर्चाने जाणे टाळत आले होते. 

खावुन खावुन काय खाणार तर बटाटी, पनीर , अननस आणि आपलं इकडलं तिकडलं.

आज जाणे झाले. 

सुरवातीचे बारबेक्यु केलेले पदार्थ आवडले खरे पण मुख्यं जेवण तितकेसे मनास उतरले नाही. कदाचीत चमचमीत, मसालेदार पदार्थ त्यांना खावेसे वाटत नाही त्यामुळे असावं. 

पण छोटे छोट गुलाबजामुन , मकाई हलवा त्यांना फार भावला.

भजनलाल डेयरी

 भजनलाल डेयरी मधल्या गाईम्हैशी पण डेटॉलनी धुवुन काढत असतील काय ? 

केसरी खरवस, लस्सी , श्रीखंड आणि दही.

वरती कलाकंद , जरासाच , चाखायला.

कैलास पर्बत

 old post

आज राजाभाऊंनी विचार केला ते नाराज तर आपण देखील नाराज.  

आता ही नाराजी घालवायची कशी तर सिंधी पध्दतीचे जेवण जेवुनच. आणि मग राजाभाऊ साकीनाकाच्या "कैलास पर्बत " मधे पोचले.

पण एक घोटाळा झाला. 

त्यांना जबरदस्त  भुक लागली होती,  घाई झाली होती , जणु की सत्तासंपादनाची  आणि मग ते सिंधी भोजन विसरुन गेले आणि भलतेच मागवले . ह्या कैलास पर्बतची खासीयत आहे "छोले भतुरे " त्वरीत मिळु शकतील असे त्यांना वाटले होते खरे पण वाटतं तसं नेहमी घडतच असे नाही.  

एक गडबड झाली.  

ह्या छोले भतुऱ्याने यायला खुप वेळ लावला.  आतापर्यंत कसाबसा धरलेला धीर पण सुटु लागला.  अखेरीस ते आले आणि ताटात पडले..

खरं म्हणाजे राजाभाऊंच्या निष्ठा दुसरीकडे वाहिलेल्या. कुलाब्याच्या कैलास पर्बत मधे जाण्यात त्यांची उभी हयात गेलेली. आता त्याची रया गेली आहे ही बात वेगळी. पण म्हणुन काय झाले. निष्ठा म्हणजे निष्ठा. त्यात तडजोड नाही.  

काय करायचे आता दुसरा इलाजच नाही आणि मग नाईलाजस्तव आणि जराश्या नाराजीनेच टम्म फुगलेल्या पुऱ्याचा उपभोग घेणे सुरु केले.





Tuesday, September 13, 2022

याझदानी बेकरी

खुप महिने, वर्षे झाली असतील "याझदानी बेकरी" मधे बनमस्का, ब्रुनमस्का खायला राजाभाऊ गेलेले नाही. आज अचानक आठवण झाली.






















Monday, September 12, 2022

विनय हेल्थ होम

 खरेदी आधी की खाणं आधी. खाणं आधी की खरेदी आधी ?

आज राजाभाऊ उगीचच परत खाण्यावरुन वाद नको, आधीच झाले आहेत तेवढे पुरे झालेत म्हणुन मुकाट्याने गप्प बसले आणि खाली मान आणि रिकामे पोट घेवुन लोहार चाळीत खरेदीला गेले, मग तेथुन गिरगावात गणपतीसाठी सोनाराकडुन आपलं छोटं छोटं,  काहीतरी लहानसहान जिन्नस घेण्यासाठी.

खरेदीला निघाल्यावर प्रथम बाहेर उपहारगृहात खावुन घ्यावे व खरेदीला जावे हा राजाभाऊंचा एक आवडीचा सिद्धांत, मग कसे भरल्यापोटी खरेदी करायला उत्साह येतो.  आधीच वातावरण तापलेले मग उगीचच त्यात भर नको. 

आज आधी खरेदी झाली मग नेहमीच्याच "विनय हेल्थ होम " मधे मिसळपाव, उसळपाव नामक तामसी पदार्थ खाण्यासाठी. 

आज थोडासा बदल. उसळपाव ऐवजी पातळभाजीपाव. 

तेवढाच आपला चेंज.






Sunday, September 11, 2022

मुच्छड पानवाला

 काल रात्री मस्तपैकी "कॉपर चिमणी" मधे जेवण झाले. 

बाहेर पडल्यापडल्या काळेकाकुंना पान खाण्याची हुक्की आली.

मग काय.

राजाभाऊंची गाडी वळली केम्स कॉर्नरवरील "मुच्छड पानवाला " कडे.

मघई खाण्यासाठी



कॉपर चिमणी

राजाभाऊंनी कितीही परीपत्रकं काढली , कितीही वटहुकुम काढले तरी त्याची अंमलबजावणी होईलच ह्याचा नेम नाही.

आणि विशेष गंमत म्हणजे हे आदेश धुडकावुन लावायला तेच स्वःत पुढे असतात.

आता कालचंच उदाहारण. 

गेल्याच महिन्यामधे राजाभाऊंनी फतवा काढली होता. आता बंदी, ह्याच्यापुढे बंदी, कायमची बंदी. ह्या नजदीकच्या काळात आपण पुर्वी ज्या भोजनगृहात भोजन केले आहे, ह्या उपहारगृहामधे खाणे खाल्ले आहे तेथे परत म्हणुन जायचे नाही.  अजुन अश्या कैक जागा आहेत जेथे आपण कधीच गेलेलो नाही किंवा का कोण जाणे जाण्याचा विचारही केला नाही. 

पण जेव्हा काल रात्री बाहेर जेवायला जाण्याचे ठरवले गेले तेव्हा राजाभाऊंनी आपल्या सवयीनुसार , आवडीनुसार नेहमीच्याच वरळीच्या "कॉपर चिमणी " मधे जेवायला जाण्याचे सुचवले.  ह्या "कॉपर चिमणी" मधे आतापर्यंत किती वेळा ते जेवायला गेले असतील त्याची मोजदातच होणे नाही, पार पुर्वी "नॅब" च्या जागी असल्यापासुन ते आताच्या ह्या जागेत जाणॆ होत आहे. काय त्यांना तेथल्या जेवणाची एवढी भुरळ पडते ते केवळ तेच जाणे. पण ह्या जागी त्यांच्या खाण्यामधे तसे नाविन्य म्हणुन नाही. हिरवी चटणी, सोबत क्रिस्पी रुमाला रोटी, मकई शीग कबाब, दम आलू सोबत काबुली नान आणि शेवटी व्हे. बिर्याणी.  प्रत्येक वेळी हाच मेन्यु.

त्यात परत कालचा दिन तसाच खास होता. बहिणाबाईंचा पन्नासावा वाढदिवस. 

मग काय. जोर लगाके, हैय्या, जोर लगाके.









विनय

 माणसाने कधी ही खोटे बोलु नये.

माणसाने कधीही कोणी फेसबुकवर मिसळ बद्द्ल लिहिले तर ती लगेचच खायला जावुन नये.

बरं मिसळ खायला गेलाच आहे तर मिसळ खावुन मुकाट्‍याने बाहेर पडावे.

राजाभाऊ भल्यापहाटे मिसळ खायला "विनय" मधे गेले खरे पण चुकुन उसळपाव खावुन बाहेर पडले.

मग कधीतरी सकाळी गणापती पाहुन झाल्यावर उदार होत घरी दुरध्वनी केला. "सकाळी आत खायला काही करु नकोस, "विनय" मधुन काय आणु ? " 

"आम्हाला मिसळ आण, तुला काय पाहिजे ते आण, तु काही खाल्लेस का "

राजाभाऊ  "नाही " म्हणुन गेले.

मग काय, घरी गेल्यावर भरल्या पोटी मिसळ.






मग काय राजाभाऊ. काय विचार ? लहान की मोठा ?

 मग काय राजाभाऊ. काय विचार ? 

लहान की मोठा ?



उकडीचे मोदक

 


Friday, September 09, 2022

आम्ही सारे खवय्ये

https://www.facebook.com/groups/178353552201285 

हॉलीडे इन

 एकदा का कानफाट्या नाव पडले की ते बिरुद त्याला आयुष्य भर चिकटले समजा. त्याने कितीही घसा सुकेपर्यंत ओरडओरड सोरडून सांगितले मी  खरच ह्यातल्या एक सुद्धा पदार्थ नाही खाल्ला, जरा सुद्धा नाही खाल्ला , अगदी चव घेण्यासाठी देखील , तरी पण त्या राजाभाऊंवर विश्वास ठेवणे नाही.

आता वजन कमी करण्याच्या ह्या नव्याने सुरु केलेल्या प्रयत्नाचा हा एक भाग की खाण्यासाठी वेळ नसल्यामुळे राजाभाऊंनी या साऱ्या पदार्थांवर ताव मारला नाही हे सांगणे तसे कठीण आहे. पण नाही खाल्ले हे मात्र खरे.

खरे ? 

एक अपवाद सोडून. "ॲपल इन रेड वाईन." 

ते ही घाईघाईत.

परत एकदा साकी नाक्यावरच्या हॉलीडे इन मधे जायला हवं, फुरसतीने. 

ह्या इथले बुफे जेवण खुप आवडले व इतरांच्या तुलनेने किंमत बऱ्यापैकी कमी आहे. 

कार्यालयाच्या जवळ असुन देखील आयुष्यभर "हॉलीडे इन" आतापर्यंत आपण कधीच का गेलो नाही हा प्रश्न आज येथे जेवल्यानंतर राजाभाऊंना सतवत आहे.





उकडीचे मोदक

 देव जेवल्याशिवाय आपण जेवायचे नाही , ह्या कल्पनेचा उगम कोणाच्या डोक्यातुन झाला असेल 

त्याचे पाय धरायचे आहेत. काय प्रचंड धीर असलेले ते गृहस्थ असतील.

राजाभाऊ सकाळी श्रीमती मुकादम यांच्या घरी उकडीचे मोदक घ्यायला गेले. घरात मोदक बनवण्याचे काम जोरात सुरु होते.  बाप्पा आणि त्यांचे असंख्य भक्त हे उकडीचे मोदक आज खाऊन तृप्त व्हावेत यासाठी काल रात्री पासुन त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक . जेथे दृष्टी जाईल , नजर जाईल तेथे मोदकच मोदक. 

हे सारे मोदक पाहुन वेडापिसा झालेल्या राजाभाऊंनी आपल्या लालसेला कसा आवर घातला असेल हे त्यांचे त्यांनाच ठावुक.

ता.क. राजाभाऊंचे उकडीच्या मोदकांवरील अफाट प्रेम ठावुक असलेल्या मुलाच्या मित्राच्या आईने त्यांच्या साठी प्रसाद पाठवले आहे.




आतापर्यंत सात.

ओम मोदक स्वाहा

 ओम मोदक स्वाहा

ओम मोदके स्वाहा

ओम मोदके , मोदके स्वाहा

तीन पळ्या तुप ओता.

ओम मोदकाय नमः

चार पळ्या पुन्हा तुप ओता.

आता म्हणा

हे गजानना , हे लंबोदरा. मी तुझाच भक्‍त आहे, तेव्हा सांभाळुन घे आणि एकवीस मोदकाचे भक्षण करण्याची ताकद दे.



Thursday, September 08, 2022

पियुष

 तिच्यामारी, धर्मसंकटच पुढे येवुन उभे राहिले. "आस्वाद" बाहेरील गर्दी बघुन राजाभाऊंचा मोर्चा "प्रकाश" कडे वळला. बसायला जागाही पटकन मिळाली.  समोर एक जोडपे बसले होते, बहुदा पंजाबी होते, मराठमोळं पदार्थ पहिल्यांच खात असावेत.

हा पदार्थ कोणता ? तो पदार्थ कोणता ? विचारुन झाले. मग शेवटी विचारले " वो ग्लासमे येलो येलो क्या है ? 

आता यांना "पियुष" म्हणाजे काय हे कसे समजवुन सांगायचे ? 

"You know Shrikhand ? ok. This is Piyush, some sort of liquid form of Shrikhand "

ते पिवुन होईपर्यंत राजाभाऊंच्या मनात धागधुग. ह्यांना आवडेल का नाही ?

आस्वाद

 आईशप्पथ, राजाभाऊंनी आज फायनल ठरवलं, फायनल म्हणजे फायनल, आता त्यात मुंगीने मेरुपर्वत गिळला तरी तिळमात्र बदल होणार नाही. 

ह्या पुढे शिवाजीपार्कच्या "आस्वाद" चे नाव पण काढायचे नाही. तेथे पोळाउसळ खाण्यासाठी म्हणुन मुद्दामुन जायचे आणि उपहारगृहाबाहेरची गर्दी बघुन छातीत धडकी भरल्यागत गाडीतुन बाहेर उतरण्याची तसदी पण न घेता परत माघारी फिरायचे. 

ही घटना केवळ आजचीच नव्हे तर गेले कित्येक दिवस असंच चाललय. आता ह्या पुढे मुद्दामुन म्हणुन जाणे नाही. 

उपाशी पोटी उपहारगृहाच्या बाहेर ताटकळत बसायला भयंकर नकोसे वाटते.

आईशप्पथ, राजाभाऊंनी आज फायनल ठरवलं, फायनल म्हणजे फायनल, आता त्यात मुंगीने मेरुपर्वत गिळला तरी तिळमात्र बदल होणार नाही. 

ह्या पुढे शिवाजीपार्कच्या "आस्वाद" चे नाव पण काढायचे नाही. तेथे पोळाउसळ खाण्यासाठी म्हणुन मुद्दामुन जायचे आणि उपहारगृहाबाहेरची गर्दी बघुन छातीत धडकी भरल्यागत गाडीतुन बाहेर उतरण्याची तसदी पण न घेता परत माघारी फिरायचे. 

ही घटना केवळ आजचीच नव्हे तर गेले कित्येक दिवस असंच चाललय. आता ह्या पुढे मुद्दामुन म्हणुन जाणे नाही. 

उपाशी पोटी उपहारगृहाच्या बाहेर ताटकळत बसायला भयंकर नकोसे वाटते.


काळेकाकु मग कधीतरी ............

 काळेकाकु मग कधीतरी ............





पलंग केक

 पलंग तोड पान ठावुक आहे, जरी अजुन पर्यंत ते खाल्ले नसले तरी.

पण  "पलंग केक " ही काय भानगड आहे ? 

कधीतरी खाली उतरुन पहायला  हवे.




राजाभाऊ , फुकट खाणे मिळायचे दिवस संपले हो.

 सकाळी राजाभाऊ विमानात बसले. विमान उडले.

राजाभाऊ झोपी गेले तसेच भुकेले.

खमंग वास दरवळु लागला. राजाभाऊ जागे झाले. राजाभाऊंची भुक चांगलीच खवळली.

हवाईसुंदरींनी पडदा लावला, पडद्‍याआड त्यांच्या हालचालींना वेग आला.

राजाभाऊ आतुरतेने वाट पाहु लागले. येतील आता येतील. 

पहिली रांग. दुसरी रांग, तिसरी रांग. 

ह्यांचे गोड आणि मोहक बोलणे संपतच नाही. 

ह्या इथपर्यंत पोचे पोचे पर्यंत बंगळुर यायची वेळ यायची. 

चवथी रांग, पाचवी रांग. चला आता, हात चालवा पटापट. 

हळुहळु राजाभाऊंच्या ध्यानी काही गोष्टी येवु लागल्या.

राजाभाऊ , फुकट खाणे मिळायचे दिवस संपले हो.

स्पर्धेसाठी कुणी जज्ज वगैरे हवा आहे काय ?

 नशीब निर्लज्ज राजाभाऊंनी किंवा राजाभाऊंनी निर्लज्ज होवुन विचारले नाही की तुम्हाला ह्या स्पर्धेसाठी कुणी जज्ज वगैरे हवा आहे काय किंवा मला जरा चाखायला देता काय ?











पॉपकॉन

 जेव्हा पॉपकॉन हे फक्‍त चित्रपट पहात असतांना मध्यंतरात खाण्याची चीज होती तेव्हा पासुन हा स्टॉल या येथे , क्राफर्ड मार्केट भागात उभा आहे.