सकाळी राजाभाऊ विमानात बसले. विमान उडले.
राजाभाऊ झोपी गेले तसेच भुकेले.
खमंग वास दरवळु लागला. राजाभाऊ जागे झाले. राजाभाऊंची भुक चांगलीच खवळली.
हवाईसुंदरींनी पडदा लावला, पडद्याआड त्यांच्या हालचालींना वेग आला.
राजाभाऊ आतुरतेने वाट पाहु लागले. येतील आता येतील.
पहिली रांग. दुसरी रांग, तिसरी रांग.
ह्यांचे गोड आणि मोहक बोलणे संपतच नाही.
ह्या इथपर्यंत पोचे पोचे पर्यंत बंगळुर यायची वेळ यायची.
चवथी रांग, पाचवी रांग. चला आता, हात चालवा पटापट.
हळुहळु राजाभाऊंच्या ध्यानी काही गोष्टी येवु लागल्या.
राजाभाऊ , फुकट खाणे मिळायचे दिवस संपले हो.
No comments:
Post a Comment