राजाभाऊंना वरळीचे कॉपर चिमनी व तेथले जेवण नेहमीच मोहवत आलेले आहे. साद घालत आलेले आहे.
त्यांच्या आवडीच्या रेस्टॉंरंट मधे याचा क्रमांक फार फार वरती लागतो. या जागी राजाभाऊ नेहमीच येथल्या चविष्ट जेवणाचा मनापासुन आस्वाद घेत आले आहेत. ही एकमेव जागा अशी असेल जेथे जेवतांना आपण मांसाहार करत असतो तर नक्कीच हे खाल्ले असते, ते खाल्ले असते असे राजाभाऊंना केव्हातरी वाटत रहाते. जेव्हा जेव्हा त्यांच्या घरच्यांना एखादा प्रसंग साजरा करायचा असेल त्या त्या वेळी हे रेस्टॉंरंट हमखास ठरलेले.
राजाभाऊंचे जे जेवण मकाई मलई सीग , त्यासोबत मिळणारी मस्त चटणी, क्रिस्पी रुमाली रोटी ह्यापासुन सुरु झाले ते दम आलु, मलई कोफ्ता आणि ते ही काबुली नान सोबत यांनी संपले. खरं तर बिर्याणी खाण्याचे खुप मनात होते. पण त्यांनी आपला हात जरा आखडता घेतला.
कॉपर चिमनी मधे मांसाहारी लोकांची मोठी चंगळ असते. आणि ते ह्या सामिष पदार्थांची मजा पुरेपुर लुटतात. आणि त्यांच्या बरोबरच्यांनी ती मजा केलीच.
No comments:
Post a Comment