गेले काही दिवस रात्रंदिवस राजाभाऊंचा डोक्यात सतत "राजा, महाराजा " हे दोन शब्द एवढे घोळत होते की जेव्हा आज भोजनमैफल कुठे जमवायची याचा विचार करताक्षणी त्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव आले ते म्हणजे " महाराजा भोग "
ही निवड अगदी चपखल जमली. जिच्या साठी हा त्यांनी आज "अलविदा समारंभ " ठेवला होता तिला हे जेवण खुप आवडल्याचे बघुन आज राजाभाऊंना समाधान वाटले. येथे जेवण मस्तच असते. "महाराजा भोग " मधे जाण्याची ही तिसरी वेळ.
आज येथले चार पदार्थ खुप आवडले.
डालपकवान, मेथीचे ठेपले, मिरचीचा फुलका, आणि मुगाच्या डाळीची खिचडी. येथेले वाडपीपण सेवेसी तत्पर असतात. पानातील एखादा पदार्थ संपतो नं संपतो तोच तो पदार्थ तुमच्या थाळीत पडतो. यांच्या सरबाईमुळेच मन प्रसन्न होवुन जाते.
त्यात परत आज " डालपकवान " होते. ह्या योगायोगाचे त्यांना आश्चर्य वाटले. हा पदार्थ खायला जाण्यासाठी त्यांच्या एका स्नेह्यांनी त्यांना बोलवले होते.
No comments:
Post a Comment