Thursday, September 22, 2022

मोदक

 Suranga Daté  यांनी मोदकप्रिय राजाभाऊंच्या एका पोष्ट वर चविष्ट कविता रचली आहे

राजाभौंनी हंड्ब्रेक सोडला , गाडी गियर मध्ये टाकली,

आणि एकदम थबकले ....

गूळखोबरं -किसमिस -इलायची च्या वासाने वेडे झाले

आणि क्लचवरचा पाय निघाला .....

हात हळू हळू डब्यापर्यंत गेले ,,,,,

मोद्क्मय मन ,

मोद्क्मय डोळे ,

मोद्क्मय नाक,

हात शिवशिवले .

अचानक विचार आला,

बाप्पा साठी किती लोक मोदक करतात ,

छोट्या मुलांचे प्रायोगिक मोदक ,

मोठ्या मुलीनी केलेले मोदकाचे मनापासून प्रयोग,

गृहिणीने केलेले उत्क्रष्ट जिन्नस,

काही कलाकृती, काही ओबडधोबड ,

काही श्रद्धेने काठोकाठ भरलेले, मुलांपुर्तेच पर्व्डलेले ,

आणि काही सज्जन गृहस्थांनी

आपापल्या दुकानात बायकांना मदत म्हणून ठेवलेले मोदक.

बाप्पा ला हे खाउ का ते खाउ , असे होत नसेल का ?

बाप्पाच्या तोंडाला पाणी सुटत नसेल का ?

हावरट उंदीरमामाना ब्रेक लाउन, बाप्पाने मनाला आवर घातला असेल.... 

राजाभौन्चा हात परत गाडीच्या चाकावर आला,

मोदकांच्या डब्यांनी सुटकेचा निश्वास टाकला ,

किल्य्या फिरल्या , क्लच दाबले गेले,

गाडीनी वेग धरला ,

आणि सर्व मोदक सुखरूपपणे वहीनीन्च्या पर्यंत जाउन पोचले..

No comments: