Friday, September 30, 2022

द ऑर्किड

 कालच्याला राजाभाऊंनी एक गडबड घोटाळा करुन ठेवला. चष्मा खाली गाडीत विसरले आणि "मोस्टली ग्रीलस" ह्या श्री. विठ्ठल कामतांच्या "द ऑर्किड" मधल्या रेस्टॉरंट मधे जेवायला गेले.

खरं तर हे गच्चीवरील मेक्सीकन फुडचे रेस्टॉरंट. त्यात जावुन जावुन मागवले काय तर तंदुरी पॅटर, आणि आपलं नेहमीचच पनीर तिक्का मसाला, माखनी डाळ आणि भात. करणार तरी काय, मेन्युमधे काय काय पदार्थ आहेत हे वाचताच येत नव्हते. आणि तेथे सुरु असलेल्या संगीतामुळे दुसऱ्या कोणाशी बोललेले ऐकु येत नव्हते. 

राजाभाऊंना वाटले होते की त्यांना "बुलेवार्ड " या बुफे जेवण मिळत असलेल्या रेस्टॉरंट मधे जायचे आहे. राजाभाऊंचे हे एक आवडीचे ठिकाण. सात माळ्यावरुन खाली पडणाऱ्या पाण्याच्या भवती असलेले. त्यांचा स्प्रेड ही जबरदस्त आहे. 

आधी ते  "बुलेवार्ड " मधे जावुन पोचले, सर्व खाणॆ पाहुन वेडेपिसे झाले. काय खावे, किती खावे याचे आराखडे मनाशी तयार होत असतांना उठुन दुसरीकडे जायला लागले आणि पनीर तिक्का मसाला खायला लागले.







No comments: