old post
आज राजाभाऊंनी विचार केला ते नाराज तर आपण देखील नाराज.
आता ही नाराजी घालवायची कशी तर सिंधी पध्दतीचे जेवण जेवुनच. आणि मग राजाभाऊ साकीनाकाच्या "कैलास पर्बत " मधे पोचले.
पण एक घोटाळा झाला.
त्यांना जबरदस्त भुक लागली होती, घाई झाली होती , जणु की सत्तासंपादनाची आणि मग ते सिंधी भोजन विसरुन गेले आणि भलतेच मागवले . ह्या कैलास पर्बतची खासीयत आहे "छोले भतुरे " त्वरीत मिळु शकतील असे त्यांना वाटले होते खरे पण वाटतं तसं नेहमी घडतच असे नाही.
एक गडबड झाली.
ह्या छोले भतुऱ्याने यायला खुप वेळ लावला. आतापर्यंत कसाबसा धरलेला धीर पण सुटु लागला. अखेरीस ते आले आणि ताटात पडले..
खरं म्हणाजे राजाभाऊंच्या निष्ठा दुसरीकडे वाहिलेल्या. कुलाब्याच्या कैलास पर्बत मधे जाण्यात त्यांची उभी हयात गेलेली. आता त्याची रया गेली आहे ही बात वेगळी. पण म्हणुन काय झाले. निष्ठा म्हणजे निष्ठा. त्यात तडजोड नाही.
काय करायचे आता दुसरा इलाजच नाही आणि मग नाईलाजस्तव आणि जराश्या नाराजीनेच टम्म फुगलेल्या पुऱ्याचा उपभोग घेणे सुरु केले.
No comments:
Post a Comment