Thursday, September 08, 2022

सुखसागरची पावभाजी

 गाईच्या कळपात मोकाट सुटलेल्या वळु सारखेच आज राजाभाऊ सकाळपासुन उधळले आहेत. फरक एवढाच की गाईंच्या ऐवजी उपहारगृहे आणि भोजन गृह.

सकाळपासुन सुरु झालेल्या खाद्यभ्रमंतीची अखेर मध्यरात्री मघईजोडी पानाने झाली.

त्याआधी राजाभाऊंनी सुखसागरची पावभाजी रिचवली होती. 

गिरगाव चौपाटीकडचे सुखसागर. मुंबईमधे आणि एकंदरीत सर्वत्र ज्यांनी पावभाजीसंस्कृती  आणली, रुजवली आणि गेली कित्येक दशके उत्तम चव असलेली पावभाजी खायला घालणाऱ्यांत सुखसागरचा क्रमांक फार फार वरती लागतो.  सरदार, कॅनन , भुलेश्वरची खाऊ गल्ली आणि सुखसागर ही पावभाजीप्रेमींची पंढरी होय.  आता कॅनन आणि खाऊ गल्लीबद्दल सांगता येणे कठीण आहे. पण या इतर दोघांनी मात्र अजुनही परंपरा जपली आहे. 

रात्री दोन वाजेपर्यंत दवाजे उघडे असलेल्या या सुखसागरच्या मुळे निशाचर राजाभाऊ नेहमीच निर्धास्त राहिले आहेत. कितीही उशीर झाला असलातरी या दिशेने गाडी वळवल्यानंतर आपले उदरभरण होणारच यांची त्यांना सदैव खात्री वाटत आली आहे.








No comments: