श्री. चंद्रमोहन कुलकर्णीसरांचे चित्रप्रदर्शन पाहुन झाल्यावर मग फोर्ट मधल्या एखाद्या उपहारगृहात उदरभरण करावयासी जावे असा जणु अलिखित नियमच आहे की काय असे राजाभाऊंना गेले काही दिवस त्यांच्या दोन स्नेह्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या उपहारगृह, भोजनगृहावर , जेवणावर लिहिलेल्या पोष्ट वरुन वाटत होतं.
त्यात परत काल राजाभाऊंना त्यांच्या कार्यालयात दोन सहकाऱ्यांची झालेल्या उपहारगृहासंबंधी झालेल्या चर्चेत आपले ह्या विषयावर किती ज्ञान तोकडे आहे, अजुन कितीतरी ठिकाणी खायला , जेवायला जायचे आहे हे प्रकर्षाने जाणवले होते. मग त्यांनी मनाशी ठरवलं , आता आपण ज्या ठिकाणी खाल्ले आहे तेथे मुद्दामुन म्हणुन जायचे नाही, नविन नविन जागा शोधायच्या.
काही उपहारगृह आयुष्यभर आपल्या अगदी डोळ्यासमोर असतात पण का कोण जाणे आत जावुन खाणॆ काही होत नाही. ह्या भागातली काही ठिकाणं आज हेरुन ठेवली आहेत.
बॉंम्बे हाऊस समोरचे "पुर्णिमा रेस्टॉंरट " हे त्यापैकी एक. त्यात परत दाक्षिणात्य पदार्थ व मिल्स म्हणजे राजाभाऊंचे अतिशय आवडणारे. पण आज दुपारी येथे हल्लाबोल करायचा त्यांचा विचार जो होता तो कोणीतरी हाणुन काढला. काळेकाकूंना "याझदानी" मधे बनमस्का-चाय खायला जायचे होते. मग काय, बनमस्का तर बनमस्का.
देशविदेशातले खाद्यपदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉंरंटाची संख्या मुंबईमधे किती झपाट्याने वाढते आहे, आपण ह्या बदलास अजुनपर्यंत आपण तयार झालेलो कसे नाही हे सुद्धा राजाभाऊंना आज अलाना स्ट्रीट वरचे "बर्मा बर्मा " समोरुन जातांना जाणवले. कधीतरी ब्रम्हदेशातले जेवण जेवायला येथे यायला हवे.
आता "फोर्ट सेंट्र्ल " गायब होवुन त्याची जागा "३८ बॅंकॉक स्ट्र्रीट " नी घेतली आहे. "फोर्ट सेंट्र्ल " मधे कधीतरी डोसे खायला जाणॆ व्ह्यायचे. आता बॅंकॉकला पण जायला हवं.
आता शाकाहारी माणसांना "ग्रब कॉर्नर " मधे काय खायला मिळणार ? पण येथे जावुन राजाभाऊ तुम्हाला ॲपल पाय, मावा केक वगैरे जावुन खायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment