काल रात्री घरी जातांना शास्त्री रोडवर असलेल्या काका हलवाईच्या समोर हल्लीच सुरु झालेल्या "सॅफ्रन " नामक रेस्टॉंरंटनी राजाभाऊंचे लक्ष वेधुन घेतले होते. लगेचच आजच्या सकाळी सपत्नीक ते तेथे पोचले.
पण एकतर तेथे खुप गर्दी होती आणि अशी ठिकाणे त्यांना फारशी भावत नाहीत म्हणुन मग ते तेथुन निघाले. आज निवांतपणे, चवीचवीने , शांतपणे , तिच्या सोबत जेवावसे त्यांना फार वाटत होते.
आणि परत त्यात श्रावण, त्यांच्या आवडीच्या ठिकाणी खास श्रावणासाठी म्हणुन कमी दरात ठेवलेले शाकाहारी जेवण.
मग राजाभाऊ " द बे लिफ " मधे जेवायला गेले. आज संडे ब्रंच असल्यामुळे बुफेचे दर नेहमी प्रमाणे होते. ही बाब आधी एकतर त्यांच्या लक्षात आली नाही किंवा आली असुन त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला.
Old post

No comments:
Post a Comment