ज्या सेनापतींनी " हल्लाबोल " आदेश दिले तेचनेमके ऐन वक्ताला गायब झाले. काहीश्या नाराजगीनी का होईना पण मग त्यांच्या इतर साथींनी खिंड लढवण्याची ठरवली.
"ऑपरेशन राम आश्रय " .
महेंद्र कुलकर्णींनी साद घातली आणि सुहास, आनंद, दिपक , ज्योती , आणि राजाभाऊ या सर्वांनी ह्या मोहिमेत भाग घ्यायचा ठरवला. त्यांच्या वाटेत अनेक अडचणी आल्या, अनेक जण त्यांची वाट अडवुन पुढे उभे होते पण त्यांनी कशालाही न जुमानता , अनंत काळ प्रतिक्षा करत आपले घोडे पुढे दामटवले. अखेर अन्नपुर्णादेवीला त्यांची दया आली आणि त्यांना बसण्यासाठी एकदाचे का होईना मेज मिळाले.
आधीच पोटात अग्नी चांगलाच प्रज्वलीत झाला होता, वरती त्याला चेतवण्याचे काम गरमागरम तिखट तिखट रसम नी करायला सुरवात केली.
राजाआधी भालदार ,चोपदार यायला लागले. नीर डोसा यायला जरा उशीर लागणार होता
पहिल्यांदा पोटातिर्थी पडलं ते पोंगल अविअल . त्याचा फडशा पाडायला फारसा वेळ लागला नाही. बघता बघता ते गायब झाले.
आता पुढे काय ? ही मधली जागा कशी भरुन काढायची ? मग " शीरा उपमा मिक्स " म्हणाले आम्ही आहोत ना. "नय्यप्पन " म्हणाले आम्ही काय पाप केले आहे.
हं. ह्याचा खात्मा झाला
मग अखेरीस झाले आगमन नीर डोश्याचे. सोबत लाल चटणी, नारळ, गुळाची चोय आणि सांबार.
शेवटी हा चेतावलेल्या अग्नी शांत करायला त्यात कापी ओतावी लागली.
पण हा अग्नी खरच शांत झाला का ?
का त्यात पायनापल शिरा आणि बदाम शिऱ्याची आहुती द्यायला लागली ?
रोहन , तुझी उणीव भासली खरी.
No comments:
Post a Comment