केव्हातरी आपला अंदाज चुकला, आपल्याला जे वाटले होते ते चुक होते ह्याची जाणीव होते तेव्हाचा तो क्षण आनंदाचा देखील असु शकतो.
आज दुपारी राजाभाऊ आपल्या सहकाऱ्यांसमवेत "कोकणस्थ" मधे भोजन करावयास गेले होते.
जेव्हा "कोकणस्थ" हे भोजनगृह उघडले तेव्हा राजाभाऊंच्या मनात एक अनिष्ट शंका होती, साशंकता होती,त्यांना भीती वाटत होती की आजुबाजुच्या धंदेवाईक बार कम रेस्टॉंरंटच्या गराड्यात हे मराठमोळं, गृहिणींच्या हातचे उत्तम, चविष्ट, घरगुती जेवण मिळणाचे ठिकाण कितपत तग धरु शकेल ? त्यात परत ते जरा आतल्या बाजुला, त्याची जाहिरात नाही, हे आता किती दिवस चालेल ?
पण आज बऱ्याच दिवसांनी राजाभाऊं "कोकणस्थ" मधे जेवायला गेले तेव्हा ते खुप खुष झाले, आतली गर्दी पाहुन. जवळपासच्या कार्यालयातील कर्मचारी येथे जेवायला आले होते. बसायला जागा नव्हती. एकंदरीत "कोकणस्थ" नी चांगले बस्तान बसवलेले दिसले, चांगले चाललेले दिसले.
आता शाकाहारी जेवणाबद्दल परत काय बोलायचे. किती तारीफ केली तरी थोडीच.
राजमा, वडे, बटाटाभाजी, चटणी, श्रीखंड आणि बढीया वरणभात. साधे फोडणीचे वरण आणि उत्तम प्रतीचा तांदुळ असलेला भात.
परत कधी तरी सहकुटुंब सहपरीवार येथे जेवायला जाण्याचा बेत ठरतोय
(ही पोस्ट जुनी आहे. हे उपहारगृह अजुन चालु आहे का माहिती नाही. )
No comments:
Post a Comment