आजचा बेत फार फर्मास होता.
मस्तपैकी भरली वांगी. या भरल्या वांग्याचा मसाला किती लाजबाब लागतो. त्यात दाण्याचे कुट टाकलेले असले तर वा ! अमॄतानंदच !
पण येवढ्याने तिचे समाधान होत नाही. जोडीला पिठले, शेवगाच्या शेंगा टाकुन केलेले, चव आणखी चविष्ट करण्यासाठी माफक प्रमाणात टाकलेली आमसुले.
नवऱ्याला आणखीन खुळावायचे असल्याने मग यासोबत बाजरीची गरमागरम भाकरी ( तुप आणि, लोण्याचा गोळा सोबत ). लसणाची, शेंगदाण्याची चटण्या.
आई ग ! तुझ्या हातच्या स्वयपाकाची चव विसरलो ग !
No comments:
Post a Comment