दो आंखे बारा हाथ. दोन. डोळ्यांचा तो धाक.
लालच. मोह. माया.
कोण बघते आपल्याला ? कोणाला कळेल ? काय बिघडते ? बाप्पा तर आपलाच आहे, तो समजुन घेइल.
एकटे राजाभाऊ. गाडीत. सोबत चार.
चार डबे . उकडीच्या मोदकांनी भरलेले. गरमागरम. नुकतेच असे तयार होवुन बाहेर पडलेले.
लालच. लालच. आत्ता. आत्ताच्या आत्ता. एकच फक्त एकच. कोणाला कळणार पण नाही.
पण राजाभाऊंनी स्वःतावर ताबा ठेवला.
ते दोन डोळे कोणाचे ?
No comments:
Post a Comment