अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Thursday, July 07, 2022
बादशहा मधे फालुदा आणि सम्राट मधल्या २१० मधे ब्लुबेरी पाय.
मध्यरात्रीपुर्वीची न्याहारी.
बादशहा मधे फालुदा आणि सम्राट मधल्या २१० मधे ब्लुबेरी पाय.
आणि मध्यरात्रीनंतर
बन मस्का. चहा शिवाय.
Tuesday, July 05, 2022
राजाभाऊंचे द्रोणातील जांभळे खावुन समाधान झाले असेल असं वाटतं?
राजाभाऊंचे द्रोणातील जांभळे खावुन समाधान झाले असेल असं वाटतं?
आत शांतपणे जेवायला बसलेल्या काळेकांकांचे लक्ष भलतीचकडे.
" काय रे बाबा, काय घेवुन चालला आहेस टोपलीत ? , दे आपली वीसतीस रुपयाची. "
दुर्गाबाई भागवत यांचे "खमंग"
दुर्गाबाई भागवत यांचे "खमंग" नावाचे पुस्तक आहे ज्यामधे त्यांनी अनवट, काळाच्या ओघात नाहीश्या झालेल्या पाककृती दिल्या आहेत.
त्यातल्या काही पाककृतींची ही नावे, जी राजाभाऊंनी आपल्या घरी करण्यास काळेकाकुंकडे फर्माईश केली.
दिवस पहिला - भोपळ्याचे थालीपीठ
दिवस दुसरा -गव्हाच्या भरड्याची खिचडी
तिसरा - एकत्र पिठलं-भात
कानवले
उकडलेली करंजी.
काकडीचा कायरस
कोळ्याचं भरीत
कुवळाचे पोहे
उकडपिंडी
केवड्याच्या कणसाची भाजी
केवड्याचा कात
वालाचे मिठाणे
उकडीच्या भाकऱ्या
ओतलेली भाकरी
गाकर
उकडीची पोळी
गोड धिरडं
घाटलं
माडगं
गुळवणी
फणसाची सांदणं
पोह्याची खीर
गव्हले भात
मठिया
मटकीच्या पोळ्या
बेसवार
रताळ्याच्या पानाची भाजी
आणि काळेकाकुंच्या हातचा धपाटा
दुर्गाबाईचं "खमंग " आणल्याबद्दल.
रामा नायक
राजाभाऊंनी काल फक्त नुसत्या भाज्यांवर ताव मारला. आंब्याच रायतं आयुष्यात पहिल्यांदा जी त्यांनी खाल्ली.
आंब्याच रायतं, अवियल आणि व्हे. कुर्मा.
रसमभात, सांबार भात, दही भात, वरणभात कॅन्सल.
खरं म्हणजे काल पाऊस नुसता कोसळून राहिलेला. अश्या ह्या वातावरणात राजाभाऊंना गरमागरम "रसम" पिण्याची हुक्की आली मग ते "रामा नायक " मधे पोचले, रसम पिण्यासाठी.
म्हणजे नाही म्हटले तरी पाचसात वाट्या भरुन रसम राजाभाऊंच्या पोटात गायब झाले खरे पण त्यांचे मन मात्र "आंब्याच्या रायतं " मधे गुंतलेले.
आणि शेवटी म्हैसुर हलवा. तो ही पहिल्यांदाच खाल्लेला.
आमटीभात. गरमागरम आमटीभात.
राजाभाऊंच्या मनाने पंख फडफडत, पंख पसरवत उड्डाण केले , पोचले ते थेट भिमाशंकरच्या वाटेवर.
पेठ उर्फ कोथळीगड मार्गे ते चार जण निघालेले. गच्च हिरवेकंच रान, घनदाट जंगल.
तुफानी तो पाऊस. जणु माथ्यावर वसलेल्या "सिर पै धरी गंग" वाल्या "पिनाकी महाग्यानि " नी एक बट सैलावत, खाली सोडलेली गंगा.
गंगा अंगावर झेलत, तिचा मारा सहन करत , बेभान, मस्तवाल झालेले ओढेनाले पार करत, रस्ता चुकल्याने भरकटलेले असे ते चौघे , आपल्या नेताजींवर सारी भिस्त ठेवत मार्गक्रमण करणारे
बरोबर दिशा धरुन चालत, डोंगरदऱ्या पार करत अंधाऱ्या रात्री मुक्कामी पोचल्यावर चुलीवर शिजलेल्या गरम भाताचा तो भलामोठाला डोंगर, त्यावरची ती वाफाळलेली आमटी.
विसरणे नाही.
अंतिम सत्य एकच.
आमटीभात. गरमागरम आमटीभात.
Thursday, June 30, 2022
गरमागरम भाताच्या एक चांगलासा डोंगर आणि बोटं व साथसाथ जीभ भाजवणारी डाळ.
तुफानी बरसात. जणु काही वादळच. भिमाशंकरच्या जंगलात वाट चुकलेले ते, भटक भटक भटकुन , अनेक डोंगर चढउतार करुन कधी तरी रात्री भिमाशंकरला पोचलेले ते . झोपायला थंडगार, ओलावलेली जमीन आणि समोर आलेला आणखीन एक भलामोठा डोंगर. क्षणभर वाटले आता त्यावर चढाई करायची तरी कशी ?
गरमागरम भाताच्या एक चांगलासा डोंगर आणि बोटं व साथसाथ जीभ भाजवणारी डाळ.
अन्नदाता सुखी भव ! त्या तश्या रात्रीत भुकेल्या जीवास पुन्हा एकदा स्वयपाक करुन वाढणाऱ्या त्या बाईंचे आभार मानावे तेवढे थोडेच.
परमसुख , परमसौख्य , परमभाग्य म्हणतात ते हेच.
एवढे मर मर मरुन चांगले जेवण केले तर जेवायला नको
सर्वांच्या आधी एकट्याने जेवायला बसलं की एक धोका असतो.
पाठच्यांचा विचार करुन थोडे हात राखुन जेवलं तर
"एवढे मर मर मरुन चांगले जेवण केले तर जेवायला नको , विचित्र माणुस आहे "
आवडा हात मारला तर
" काय कळतं की नाही ? पाठचांच्या विचार नाही, दुसरे कोण जेवायचे आहे त्याचे भान नाही. "
श्रुती मंगल कार्यालय. उकदीचे मोदक खाण्यासारखे सौख्य नसावे.
हाण गणप्या हाण.
श्रुती मंगल कार्यालयात जेवायला जाणे व ताटातले गरमागरम तुप सोडलेले उकदीचे मोदक खाण्यासारखे सौख्य नसावे.
वेसावे कोळी सी फुड फेस्टीवल
राजाभाऊ कधी केव्हा कुठे आणि कशासाठी जातील याचा नेम नाही.
आता मुळात शाकाहारी असलेल्या राजाभाऊंना घरापासुन दुर असलेल्या वेसावे कोळी सी फुड फेस्टीवलला जाण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. पण ते गेले खरे.

















































