राजाभाऊंच्या मनाने पंख फडफडत, पंख पसरवत उड्डाण केले , पोचले ते थेट भिमाशंकरच्या वाटेवर.
पेठ उर्फ कोथळीगड मार्गे ते चार जण निघालेले. गच्च हिरवेकंच रान, घनदाट जंगल.
तुफानी तो पाऊस. जणु माथ्यावर वसलेल्या "सिर पै धरी गंग" वाल्या "पिनाकी महाग्यानि " नी एक बट सैलावत, खाली सोडलेली गंगा.
गंगा अंगावर झेलत, तिचा मारा सहन करत , बेभान, मस्तवाल झालेले ओढेनाले पार करत, रस्ता चुकल्याने भरकटलेले असे ते चौघे , आपल्या नेताजींवर सारी भिस्त ठेवत मार्गक्रमण करणारे
बरोबर दिशा धरुन चालत, डोंगरदऱ्या पार करत अंधाऱ्या रात्री मुक्कामी पोचल्यावर चुलीवर शिजलेल्या गरम भाताचा तो भलामोठाला डोंगर, त्यावरची ती वाफाळलेली आमटी.
विसरणे नाही.
अंतिम सत्य एकच.
आमटीभात. गरमागरम आमटीभात.
No comments:
Post a Comment