अगदी खरं खरं सांगतो यावेळी ह्या उपहारगृहात मिळणारे खाद्यपदार्थ खाणे हे तेवढे महत्वाचे नव्हते. महत्वाचे होते की आतमधे नुसते बसुन शांतपणॆ केवळ बाहेरचा निसर्ग न्याहाळत बसणे.
चार एक वर्षापुर्वी असेच कधीतरी पावसाळ्यामधे आंबेत मार्गे राजाभाऊ दापोलीला निघालेले. "देशमुख बाग " मधे खाण्यासाठी ते थांबले आणि ह्या जागेच्या ते प्रेमात पडले.
यावेळी ही आंबेतमार्गे परतण्यामागे "देशमुख बाग " मधे थांबणे हा सुद्धा त्यांचा छुपा बेत होता.
No comments:
Post a Comment