आज आषाढ अमावास्या . . मग श्रावणमास सुरु. श्रावणमास आणि विस्म्रुतीत जात चाललेल्या श्रावणमासाच्या कहाण्या.
आटपाट नगर. घरोघरी दिपपुजा झाली असेल. रात्री,मध्यरात्री सर्व दिवे विझल्यानंतर मग माळरानावर काळोख्या रात्री जमले. त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी सुरु झाल्या. आज कोणाकडे काय खाल्ले, नेवैद्याला काय होते वगैरे वगैरे.
मग राजाभाऊंकडचे दिवे सांगु लागले, जे त्या दिव्यांनी खाल्ले व जे राजाभाऊंनी गुपचुप गुपचुप हाणले ते. त्या गरमागरम बृनमस्काचे गुपित जो एकट्यानेच खाल्ला गेला.
हे आता त्यांच्या बायकोपासुन लपुन राहु शकते पण हे दिवे , ते तर सर्वज्ञानी.
आता घरी जाण्याच्या वाटेवर " सिटी बेकरी " येते त्याला काळेकाका काय करणार? गाडी चालवता चालवता नजर हमखास डावीकडे वळायला व आतुन गरमागरम पावांनी भरलेले ट्रे च्या ट्रे बाहेर काऊंटर येणे . निव्वळ योगायोग.
दिवसाआड घडणारा.
No comments:
Post a Comment