Saturday, August 29, 2009

स्वाईन फ्लु चा असा उठवावा लाभ

प्रतिकार शक्ती वाढवा, आमचा च्यवनप्राश खा.

महागाईच फ्लु हटवा, आम्हाला मत द्या.


कोणाला काय, कशाचे काय

गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर जा !!

गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर जा !!


होय बाप्पा.


रात्रीचे १० ते १, जवळजवळ तीन तास आपल्याला एकाच जागी आपल्या भक्तमंडळींनी ताटकळत उभे ठेवले होते, त्यांची हौस भागवण्यासाठी, कर्णॅकर्कश वाद्यांच्या तालावर नाचण्याचे. त्यात परत हा आवाज कमी पडतो म्हणुन मग मोठाले भोंगे.


थकल्याभागल्या जीवास, नाही हो बाप्पा रात्रीच्या वेळी हा कानावर सतत आदळणारा भलामोठाला आवाज आता सहन होत.


बाप्पा, तुम्ही सुद्धा तुमच्या भक्तांपासुन दुसऱ्यांना वाचवण्यास असमर्थ आहात,


आणि पोलीस , त्यांचे तर हात बांधलेले. आणि ते तक्रार करणाऱ्यांचीच उलटतपासणी करण्यात माहीर.


तेव्हा बाप्पा

Tuesday, August 25, 2009

एलीस इन ब्लंडरलॅड

पण राजाभाऊ तुम्ही काहीही म्हणा अरुण शौरी यांनी जबरदस्त शब्दप्रयोगाचा वापर केला आहे " एलीस इन ब्लंडरलॅड " . ऐकुन तबियत खुष झाली.


याचबरोबर त्यांनी एक खुप चांगला मुद्दा मांडला आहे. ग़ोव्याचे माजी मुख्यंमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या सारख्या नेत्यांना वरती उचला, त्यांना जास्त वाव द्या.


श्री. मनोहर पर्रीकरांसारखे व्यक्तीमत्व राजकारणात दुर्मींळ. अश्याच नेत्यांची आज गरज आहे.

श्वेत मल्हार

अनेकदा एखादा कलावंत आपल्या परिचयाचा ( प्रत्यक्षात नव्हे ) असतो, पण असे असुन देखिल आपण त्याचे गाणे कधी ऐकलेलेच नाही हे जेव्हा जाणवते, तेव्हा एखादा धक्का बसायचा तो बसतोच.

शुभा मुगदल यांचे गाणे ऐकायला किती वर्षे लागली ? सेंट झेवियर्स कॉलेज मधे " मल्हार के प्रकार " ऐकतांना हे जाणवले.


त्या दिवशी मल्हारचा एक नवा प्रकार ऐकला " श्वेत मल्हार ". त्या आधी त्या " गौड मल्हार " "व तिलक मल्हार" गायल्या.


मजा आली.

काय हो राजाभाऊ

काय हो राजाभाऊ , काय चाललय काय ?

जेवढे नेते आत आहेत त्यांच्यापेक्षा जास्त नेते बाहेर असणार की काय ?

Sunday, August 23, 2009

खरे मानकरी

या गणेशोत्सावाचे खरे मानकरी आहेत ते मुर्तीकार व त्यांचे सहकारी.


आज मला त्यांची दया आली.


गेले कित्येक महिने अविरत ते याच क्षणासाठी ढोरमेहनत करीत आहेत.


मुर्ती नेण्यासाठी माणसे आली तरी त्यांची मुर्तीवर अजुन शेवटचा हात फिरवायचा बाकी आहे, त्यांची गेले कित्येक दिवस तहानभुक हरपुन , शरीराच्या कमीतकमी गरजांकडे देखिल कानाडोळा करत केलेली २४ तासाची मेहनत देखिल अपुरी पडत आहे. त्यांचे लाख लाख आभार.

बाप्पा आणि भक्त दोन्ही तृप्त होता झाले

गजानन आले घरा







गजानन येती घरा













Friday, August 21, 2009

बाप्पा येती घरा

बाप्पासमोरील आरस करतांना, दिव्यांची तोरणे लावल्या नंतर, पहिल्या फटक्यात सर्व दिवे पेटण्यासारखे सुख नसावे.


पण हे फार थोड्याच वेळा नशिबी असते. कुठे दिवेच गेलेले असतात तर कोठे वायरच सर्वकाही नीट बघुन बसवल्यानंतर निघालेली असती, मग परत सोडवा, लावा, बदला, त्यात येखादा बल्ब हातुन निसटुन खाली पडुन फुटावा.


संतापाचा पारा वर वर चढत जावु लागतो, त्यात सुचना करणाऱ्यांची भर.


पण हा सारा त्रास केवळ त्या पाहुण्याचे आगमन होईपर्यंत.


येकदा का तो घरी आला आणि बिराजमान झाला कि मग कसे सारे श्रम सार्थकी लागतात.

काय हो राजाभाऊ

काय हो राजाभाऊ , अहवाल हे नेहमी फेटाळुन लावण्यासाठीच सादर केले जातात काय ?

Thursday, August 20, 2009

भावमुद्रा मुर्तीकार श्री. राजन वेदक यांच्या



घडीया गिनी है मैने तेरे इंतजार मे , क्या तुझको खबर है !

आजा इंतजार है तेरा !













काय हो राजाभाऊ ?

काय हो राजाभाऊ, इतिहास हा आपल्याला जसा सांगीतला गेला आहे तस्साच आपण का बरे स्विकारायचा असतो ? त्या पेक्षा वेगळा कोणताही दृष्टीकोन मांडला गेला तर तो आपल्या पचनी का बरे पडत नाही ?

Saturday, August 15, 2009

कोसा आणि मुगा


यंदाचा स्वातंत्रदिन राजाभाऊंना फारच महाग पडला. कुठे दुर्बुद्धी सुचली आणि बायकोला "सिल्क फॅब " च्या प्रदर्शनाबद्दल सांगितले.

त्यात परत त्यांना त्यांच्या मुलाने व पुतणीने दगा दिला. मधे बफर असावा, आपल्या आईला खरेदी करण्यापासुन प्रवृत्त करायला त्यांनी मुलाला सोबत घेतले होते, पण तो अचानक ऐन मोंक्याच्या वेळी गायब झाला. त्यांची पुतणी तिच्या काकीची चमची. मग काय.

त्यात परत राजाभाऊंना अचानक उदार वगैरे झाल्याचे वाटु लागले. मग त्यांनी छत्तीसगढ ची कोसा सिल्क व बिहारची मुगा सिल्क च्या साड्यांची खरेदी केली.

Friday, August 14, 2009

अगदी खरे हो भुजबळजी.

बरे झाले हो भुजबळजी, सोनारानेच कान टोचले ते.

अगदी योग्य तेच बोललात. शिक्षणचा खरेच बट्टाबोळ करुन ठेवला आहे. सगळी गंमंत जंमत सुरु आहे.

महिना झाला प्राध्यापकांचा संप सुरु आहे, कॉलेज बंद आहेत त्यात आता स्वाईन फ्लुची भर.
गेल्या वर्षी अभ्यासक्रम बदलला, नविन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात कॉलेज सुरु झाल्यानंतर बऱ्याच कालावधीनी आली, तो पर्यंत सर्व आनंदी आनंद होता.
म.टा. मधुन -
"दहावी नापासांना एटीकेटी, टंचाई, स्वाइन फ्लू आदी विषयांवरील राज्य सरकारच्या निर्णयांवर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतच जोरदार हल्ला चढवल्याने सारेच अवाक झाले. शिक्षणाचा जो काही बट्ट्याबोळ झाला आहे, त्याने मुंबईतील सत्ताधारी आमदारांना लोकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही, असे संतप्त उद्गार त्यांनी बैठकीत काढल्याचे कळते.
शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाहून 'शिक्षणाचा तर पुरता बट्ट्याबोळ झालाय', असे संतप्त उद्गार त्यांनी काढले. 'एटीकेटी, ऑनलाइन प्रवेश, ऑफलाइन प्रवेश हे निर्णय घ्यायला कुणी सांगितले होते. मुंबईतील प्रत्येक पालक हैराण झाला आहे. ज्याला प्रवेश मिळाला ते विद्याथीर्ही आनंदी नाहीत. कारण त्यांना दहावीस किलोमीटर अंतरावरील कॉलेजात प्रवेश मिळाला आहे. ज्याला प्रवेशच मिळाला नाही ते तर सरकारच्या नावाने खडेच फोडताहेत' असा हल्ला त्यांनी केला. "

Thursday, August 13, 2009

गुरु ,शिष्या आणि शिष्येच्या शिष्या




पाहु कि ऐकु, ऐकु का पाहु. हाच प्रश्न पडला आहे.
डोळ्यांनी पहायला गेलो की मग कानावर अन्याय होतो, नुसते कानांनी ऐकायला गेलो तर डोळ्यांवर.

पखावज वर साथीला स्वयंम श्री.भवानी शंकर आणि कथ्थक नृत्य गुरुवर्या राजश्री शिर्के व त्यांच्या शिष्या.

चंगळ चंगळ म्हणजे काय असते हो राजाभाऊ ? पखावज ऐकु की नृत्य पाहु कि दोन्हाचा आस्वाद एकाच वेळी घेऊ ?
रावण मंदोदरी संवाद.
मंदोदरी परोपरीने रावणास विनवीत होती, सीतेला प्रभु रामचंद्राकडे परत पाठव, तुझा वध त्यांच्या हाती निश्चित आहे, तु माघार घे , पण.
ह्या सरे उलगडले गेले कथ्थकच्या माध्यमातुन.
प्रभुरामचंद्रांनी संतापुन धनुष्य हाती घेतले , या वसुंधरेचा भार घेतलेला शेष डगमगु लागला, भयभीत झाला. हा प्रसंग काय प्रभावीपणे सादर केला . वा.
आज दुसरा आणखी एक कथ्थक कार्यक्रम पाहिला. त्यांचीच शिष्या संजुक्ता वाघचा. राजाभाऊंची पुतणी संजुक्ता वाघकडे कथ्थक शिकायला जाते. गुरुपोर्णीमे निमीत्ते आज त्यांचा व शिष्याचा कार्यक्रम झाला.

चंगंळ ,चंगळ म्हणॅतात ती ह्यालाच .
from NCPA's website -
Ravana Mandodari Samvaad is based on a dialogue between the great demon king Ravana and his wise and spirited wife, Mandodari. It is a dialogue about Ravana’s decision to retain Seeta and wage a war against Rama. A devotee of Rama, Mandodari tries her best to persuade Ravana to return Seeta and hopes to avert what she knows will be a bloody and terrible battle, doomed to result in the death of her husband. Caught between her devotion to Rama and her love for her husband, Mandodari’s predicament is a difficult one. Ravana, in his arrogance, brands her a coward for pleading with him to stop the war. Thus the war begins. Rama strings his bow and its twang shakes the entire world. Mandodari is torn apart. Finally, as we all know, Rama is victorious and Mandodari’s truth prevails. Celebrated as one of the pancha-kanyas in Hindu mythology, Mandodari is a unique woman. She is presented in this recital as an embodiment of woman-power, unusual in her powers of clarity and discernment, her ability to see reason and fight for her convictions against all odds. This presentation is in the Kathakar Paddhati format. It is supposed that in ancient times, kathakars – also called granthikas, gathakas, pathakas – were appointed in temples to narrate mythological stories through music and dance. The kathakar is therefore variously defined as a storyteller, narrator of drama and a solo performer. This piece has been performed at various festivals, including the Virasat Festival (Lucknow), the Kathak Kendra Mahotsava (Pune), among others.
Pakhawaj Dharohar is a unique Kathak presentation, based on the traditional and ancient rhythmic compositions of the oldest Indian classical percussion instrument, the ‘pakhawaj’. These compositions – known as parans – are known for their vibrancy, variety and mastery over rhythmic vocabulary. They have been composed by the late Pt. Babulalji Kathak (of the Maharaj Kudou Singhji gharana and Jaipur gharana) and by his son, the percussion stalwart, Bhavani Shankar.

अश्शी सुरेख साडी ग बाई











जर का राजाभाऊंच्या बायकोला कळले की ते आदेशभावजींचा कित्ता गिरवत, त्यांच्या पावलावर पाउल टाकत वहिनींना घेवुन पैठण्याबिठण्या खरेदीस गेले दोन दिवस , जागतीक व्यापार केंद्र, मुंबई येथे वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार प्रायोजीत "सिल्क फॅब" या प्रदर्शनाला जात आहेत, तर त्यांची खैर नाही.


विविध राज्यातुन येथे पारंपारिक सुरेख रेशमी हातमाग साड्या, ड्रेस मटेरियल विकायला कारागीर आले आहेत.


न चुकवण्यासारखे प्रदर्शन.


१८ तारखेपर्यंत आहे