Monday, January 24, 2022

 राजाबाबु, कोयले के खानी मे काम करने आदमी के हात काले होते ही है ।

आणि भाजलेले हरभरे खाणाऱ्यांचे सुद्धा. 

हा सिझन आला की राजाभाऊंचा हे गरमागरम हरभरे खाण्यासाठी जीव जात असतो. पण यंदाला अजुनपर्यंत खाल्लेले नव्हते ह्याचे कारण एकच असु शकते, आळसपणा किंवा विसरभोळेपणा.

आज अचानक याची आठवण झाली आणि आठवले की ह्या गाड्या शिक्कानगरच्या रस्त्यावर उभ्या असतात असतात. मग ते मुद्दामुन वाट वाकडी करुन भाजलेले हरभरे खाण्यासाठी गेले.




कॅफे भोसले , फोंडा

 हिटलरी राजाभाऊंना कधी कधी पोरांचे पण ऐकायला लागते. 

मग त्यांच्या बोलण्याप्रमाणॆ केल्यानंतर वाटतं, बरे झाले आपण आपल्या हेकेखोर स्वभावाला मुरड घातली. 

पोरं बिचारी चार दिवस देवस्थानात जेवुन सुकुन गेली होती. कोबीची भाजी आणि चवळीची भाजी. चवळीची भाजी आणि कोबीची भाजी. 

लोटलीवरुन केरीला जातांना राजाभाऊंची फार इच्छा होती की आजचे भोजन "विजयादुर्गा देवस्थान " मधे व्हावे. आपल्या बापाचा हाच बेत असणार हे ठावुक असलेल्या युवराजांनी मग फर्मान काढले, आता आपण फोंडामधे जेवु. आदल्या रात्री प्रभुंकडे काजु आणायल गेलो असतांना त्यानी ह्या उपहारगृहाची टेहाळणी केली होती.

"कॅफे भोसले " 

उत्तम जेवण मिळाले. बटाट्याच्या आवडलेल्या भाजीसोबत चार पुऱ्या जास्तच खाल्या गेल्या.





Tuesday, January 11, 2022

बादशहा" मधे फालुदा



क्रॉफ्रर्ड मार्केटला खरेदीसाठी जायचे म्हणजे "बादशहा" मधे फालुदा पिण्यास जाणे आलेच.

प्रश्न एकच. खरेदी आधी फालुदा की खरेदी नंतर फालुदा ?

खरेदी आधी फालुदा प्यायला जावं तर मग त्यात रमल्यानंतर कदाचीत दुकानं बंद होतात. नंतर प्यायला जावं तर खरेदी करुन करुन दमलेलो असतो, हातात पिशव्या असतात, सुटसुटीतपणा नसतो. 

एक मात्र खरं. मुंबईमधे अनेक ठिकाणी फालुदा मिळतो पण बादशहाच्या फालुद्याची सर कुणालाच नाही.







 


Appam with stew


 

American Express Bakery


 

हा बेकरीचा बोर्ड राजाभाऊंना नेहमीच आवडत अला आहे. एकदम चपखल. 


एक चांगली बेकरी. भायखळा.

आदर्श मिठाई मंदिर

 


आदर्श मिठाई मंदिर, नाना चौक, मुंबई


बासुंदी खावी तर "आदर्श" मधली. मिठाईपण उत्तम मिळायची.

मिळायची कारण हे दुकान आता बंद झाले आहे. कारण काय कळलेच नाही. 

चांगले दुकान, नेहमीचे दुकान बंद झाले हे पाहुन फार वाईट वाटतं आहे.


आस्वाद, सेनाभवन समोर, शिवाजी पार्क.

आस्वाद, सेनाभवन समोर, शिवाजी पार्क.

येथे काय खायचे ते राजाभाऊंचे ठरलेले असते. एकतर कुर्मापुरी किंवा मग पोळा उसळ.

मुंबईमधे "आस्वाद" हे मराठमोळं खाद्यपदार्थ सर्वात टॉपचं उपहारगृह आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरु नये.










 

Sunday, January 09, 2022

धुंदूर मास सोहळा साजरा करतांना "आस्वाद" मधे


 

Vasudev . Dhundur Mass in "AASWAD"

धुंदूर मास सोहळा साजरा करतांना "आस्वाद" मधे


 

धुंदूरमास साजरा करतांना "आस्वाद" मधे

https://www.facebook.com/pkale/posts/10223802546205855?comment_id=10223802708889922&notif_id=1641708464232481&notif_t=feed_comment&ref=notif 

धुंदूर मास साजरा करायला भल्या पहाटे राजाभाऊ पोचले "आस्वाद" मधे

 धुंदूर मास साजरा करायला भल्या पहाटे राजाभाऊ पोचले "आस्वाद" मधे


सनईचौघडा वादन, पारंपारीक रांगोळी, वासुदेव, मंत्रोच्चार, तीर्थप्रसाद, हळदीकुंकू, व सकाळचे प्रसन्न वातावरणात मन आणि जीव्हा दोनी तृप्त झाली.


धुंदूर मास थाळी मधे समाविष्ट : लिंबू-मध पाणी, बोरन्हाणमधील चुरमुरे, रेवडी, बोरं, हरभरा, पातळ मऊ भात सोबत तूप आणि मेतकूट, कुरडई, लिंबाचे लोणचे, ज्वारी-बाजरी थाली पीठ, लोणी, आंबोळी, लसूण दही चटणी, तीळ साटोरी, दाणे गूळ, उसाचे करवे आणि खारीक खीर असा साग्रसंगीत बेत.


मजा आली. 


पण एक खटकलं. थाळी मर्यादीत होती. रु. ३५०/= च्या हिशेबाने राजाभाऊंच्या मते साटोरी, थालीपीठ, आंबोळी जास्त हवे होते.


आस्वाद, सेनाभवन समोर, शिवाजी पार्क, मुंबई.