इन्दौर.
राजाभाऊंसाठी हा एक जादुचा शब्द आहे. खुल जा सिमसीम सारखा.
असचं एकदा राजाभाऊंना कळलं, काचमंदिर समोर असलेल्या एका भोजनगृहात "दालबाफले " मिळतात. राजाभाऊ तेथे पोचले खरे पण त्या दिवशी तेथे दालबाफले नव्हते.
आपल्या नातेवाईकांकडे आपली झालेली निराशा त्यांनी बोलुन दाखवली.
मग खास त्यांच्यासाठी दालबाफलेंचा बेत ठरवला गेला.
दालबाफले, दालबाफले आणि फक्त दालबाफले.
दोनपाच बाफल्यात गडी आटपतात हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी तो चॅलेंज स्विकारला आणि मग दालबाफले हाणहाण हाणले.
विद्या आणि हेमंत.
केवळ तुमच्याचमुळे कळले, दालबाफले ही काय चीज असते ती.
No comments:
Post a Comment