Friday, August 26, 2022

प्रकाश

 " लोकप्रभा" मधला खाण्यावरचा लेख राजाभाऊंनी वाचला आणि त्यांना अगदी प्रकर्षाने जाणवले, आपण कितीतरी महिने झाले , शिवाजी पार्क वरच्या "आस्वाद " मधे पोळाउसळ खायला गेलेलो नाही. 

मग काय. शनिवार सकाळ. 

पण दुर्दैव त्यांचे. "आस्वाद" मधे नेहमी प्रमाणेच अफाट गर्दी. मग राजाभाऊ नेहमी प्रमाणॆच "आस्वाद" बाहेरील गर्दी बघुन जसे पुढे  "प्रकाश" कडे वळतात तसेच शनिवारीही "प्रकाश" मधे पोचले. 

जेवणाची वेळ झालेली. पुरी भाजी वर समाधान मानावे लागले आणि सोबत आपली जराशीच, काळेकाकुंना साथ देण्यासाठी खाल्लेली दही मिसळ आणि खरवस.







No comments: