ऐकावे लागते बाबा ऐकावेच लागते. एक तर सर्वांना बंड करणे जमते असे नाही आणि केलेच तर ते यशस्वी होईलच याची खात्री नसते, सर्वांचीच बंड यशस्वी होतातच असे नाही आणि मुख्य म्हणजे बंड करायला हिम्मत लागते ती आणायची कुठुन ?
आजही माटुंगाभेटीत "इडली हाऊस" ला भेट देण्याची परम इच्छा मनात दाबुन ठेवावी लगली आणि राजाभाऊंची स्वारी वळली नेहमीच्याच "कॅफे मद्रास" कडे.
आज राजाभाऊंना काय झाले होते ते देव जाणे, एवढ्या डोसाचे प्रकार उपलब्ध असतांना त्यांनी डोसा न खाता चक्क इडली मागवली आणि काळेकाकुंनी "अप्पम वीथ स्ट्यु "
"अप्पम वीथ स्ट्यु" बऱ्याच वर्षानी खाल्ला. अप्पम मस्त होते. "स्ट्यु" काही फारसा भावला नाही पण सोबत मसाला डोसामधली बटाटा भाजी असल्यामुळे बहार आली.
नेहमीच शेवट "कापी" नी व्हायलाच पाहिजे हे एक शास्त्र असते.
No comments:
Post a Comment