सौ. सुरंगा दाते यांनी ह्या वाफलेल्या शेंगावर एक चविष्ट कविता केली आहे.
http://www.facebook.com/suranga.date
देशावरील पश्चिम महाराष्ट्रातील
भुइमुगा बाई शेंगा परिवार …
त्यातले काही ,
हाय-फाय भागात राहून,
मीठ वाफेचे फ़ेशिअल करून,
दक्षिण मुंबईच्या रस्त्यांसारखे
गुळगुळीत बनतात,
खोटी खारट आसवे गाळतात,
आणि चीनी मातीच्या ताटलीत
आराम करत
कोणाच्याहि आहारी सहज जातात …
आणि काही ,
खड्डया खड्डयानच्या रस्त्यावरून,
पुरा संसार एका सायकल वर घेउन
निघालेल्या फेरीवाल्याच्या बरोबर रहातात ,
आणि समुद्रावर
एका काळ्याकुट्ट गरम कढई मध्ये
आयुष्याचे चटके खाउन
इकडे तिकडे फिरत
मुंबईच्या आम जनते सारखे
धडपडत
कधी काळवंडतात,
कधी फुटतात ,
मग कालच्या वर्तमानपत्रात
न छापलेले , गुंडाळलेले
वृत्त बनतात
आणि
कुणाच्या तरी चेहर्यावर समाधान बनून
अंतर्धान पावतात
No comments:
Post a Comment