रविवार संध्याकाळ.
मालाडला एका समारंभास गेलेले राजाभाऊ अचानक हॉलमधुन गायब झाले. सगळे विचारात. हा विक्षिप्त प्राणी गेला तरी कुठे ?
पण काळेकाकु, त्या मात्र निवांत होत्या. त्यांना पक्क ठावुक.
चुकला फकीर मस्जीद मधे सापडणार.
आता नेहमीच काळेकाकांना घराबाहेर पडल्यापडल्या भुक लागते त्याला ते तरी काय करणार त्यात परत मालाड म्हणजे "गोपाल कृष्ण " हे समीकरण त्यांच्या डोक्यात पार फिट्ट बसलेले.
आधी भुकेने पेटलेला अग्नी अधिकच प्रज्वलीत करण्यासाठी एक ग्लास गरमागरम, तिखट तिखट रसम, नंतर कडक ऑनियन रवा डोसा आणि लालसेपोटी रिचवलेला मस्त मऊसुत नीर डोसा.
repost
No comments:
Post a Comment