मोहाला किती वेळा शरण जावे ?
काल मंडईत गेलो असता नजर गेली ती भुईमुगाच्या टपोरी, दाणॆदार, भरल्या तजेल्या, शेंगांच्या ढिगाऱ्यावर आणि मनी लालसा निर्माण झाली.
अतिशय गोड दाणा, त्यातल्या अर्ध्या तर रस्तातच संपल्या कच्या खाण्यात. या अश्या शेंगा भाजुन खाण्यात काहीच हशील नाही. त्यांचा योग्य तो मान ठेवलाच गेला पाहीजे.
आजचे सकाळचे पावसाळी धुंधफुंद, गारेले, मदहोशी वातावरण, सोबतीला हव्या त्या वाफलेल्या भुईमुगांचा शेंगा.
चांगल्या स्वच्छ धुवुन त्यावरची माती बाजुला केली, मग त्या कडेस किंचीतश्या फोडुन , मस्तपैकी खारेसे पाणी आत जाण्याची तजवीज केली, मग त्या झक्कास पैकी वाफल्या ( अर्थात हे सारे तिने केले, खाण्याचे काम माझ्या कडे )
खातांना या हातांनी फोडायच्या नाहीत, दांतांनी हळुवार पणे त्यावर किंचीतसा दाब दयावा, स्सरकन खारट पाणी बाहेर येथे ते चोखावे, मग अलगद आतले दाणे बाहेर काढुन त्याचा आस्वाद घावा अगदी पोट गच्च भरेस्तोवर.
No comments:
Post a Comment