दोन दिवस जीवाचे पुणे करुन घेतले.
मात्र एका ठिकाणी समजुतीचा घोटाळा झाल्यामुळे पदरी निराशी पडली.
"शिगरी " आणि "शिगरी ग्लोबल ग्रील " हे दोन वेगळे प्रकार आहेत हे त्यांना ठावुकच नव्हते. दुबईवरुन आलेल्या आपल्या पुतणीला ग्रील्ड खाद्यपदार्थ खावेसे वाटत होते म्हणुन घेवुन ते पोचले औंध ला. "शिगरी " मधे. आधीच येथे जे हवे ते मिळाले नाही म्हणुन आणि त्यांचा बुफे स्प्रेड तेवढा आकर्षक न वाटल्यामुळे त्यांनी तो बुफे जेवण जेवायचे टाळले. मग काय एखादी भाजी, तेवढीशी मजा नाही आली.
मग रात्री त्यांनी "बार्बेक्यु नेशन " मधे जाण्याचे ठरवले. "बार्ब्येक्यु नेशन " ला फोन करुन करुन राजाभाऊ थकले. जागा मिळायला तयार नाही. सगळी कडे फुल. येवुन बघा, जागा झाली तर देवु. एक दिड तास वेटींग . एक तर आपण पैसा मोजायचा आणि अमर्यादित प्रतिक्षा करत रहायचे सांगितले कोणी. मग ते सेनापती बापट रस्त्यावरच्या "मेनलॅंड चायना" मधे गेले.
आजची सकाळ उजाडली ती वादावादीने. राजाभाऊंना "आशा डायनींग हॉल " मधे जेवायला जायचे होते आणि बाकीच्यांचा नेहमीप्रमाणेच विरोध. मग ते पोचले "सयाजी " मधे.
No comments:
Post a Comment