Wednesday, September 24, 2008

लग्नाचे जेवण श्रुती मंगल कार्यालयात जेवण्यासारखे सुख नाही

आयुष्यात अनेक मंगल कार्यालयात विवाह आदी निमित्ते जाण्याचा योग येतो, जेवण जेवले जाते, पण घरी आलो की आपण काय जेवले होतो ते विसरले जाते, त्यात लक्षात ठेवण्यासारखे काहीच नसते.
 
याला अपवाद फक्त दोन मंगल कार्यालयाचा. एक पुण्यामधील श्रुती मंगल कार्यालयातील व दुसरा सांगलीतील खरे मंगल कार्यलयातील जेवणाचा. 
 
लग्नाचे जेवावे तर येथेच. 
 
श्रुती मंगल कार्यालयात लग्नाचा दिवशी जे जेवण मिळते त्या पेक्षा आदल्या रात्री जे काही जेवण मिळते ते जास्त स्वादिष्ट असते असे माझे प्रामाणीक मत आहे. बेस्ट  इन द होल वर्ल्ड.  प्रत्येक वेळी ते मी खुप एन्जॉय केलय.  त्यात अळू चे फदफदे असेल तर मग काय. राजाभाऊ खुश.      

2 comments:

Anonymous said...

मिरजेतील कुठाल्याही कार्यालयात जेऊन पहा . अगदी 'ब्रम्हानन्दी टाळी लागणे' याचा अनुभव आल्याशिवाय रहाणार नाही.

अमोल केळकर

HAREKRISHNAJI said...

Dear Amol,

How will I know that unless you invite me to Miraj