Monday, September 28, 2009

आईना-ए-गज़ल

ख़ामुशी से हज़ार ग़म सहना
कितना दुश्‍वार है ग़ज़ल कहना ।

आईना-ए-गज़ल - प्रत्येक गजलप्रेमीच्या संग्रही हा शब्दकोश असायलाच हवा, त्याला पर्याय नाही. नागपुरच्या डॉ. जरीना सानी व डॉ. विनय वाईकर यांनी अथक मेहनतीने बनवलेला.
आयुष्यात का कोण जाणे पण अनेक गोष्टी करायच्या उगीचच राहुन जातात, त्या गोष्टी अशक्यप्राय असतात, असाध्य असतात, फार महाग असतात, परवडण्यासारख्या नसतात असे ही नसते. पण राहून जातात हे मात्र खरे.
गेली १६ वर्षे राजभाऊ त्या पुस्तकाची झेरोक्स प्रत वापरत होते. पुस्तक आज घेवु, उद्या घेवु करताकरता १६ वर्षे सरली.
पण आज श्री. विवेक पटवर्धन यांच्या ब्लॉगवर http://vivek-uvaach.blogspot.com/2009/09/here-i-go-to-mall-again.html त्यांनी विकत घेतलेले पुस्तक पाहिले आणि राजाभाऊ तडक महंमद अली रस्ता वर पोचले.

5 comments:

मन कस्तुरी रे.. said...

हरेक्रिश्नाजी
"आईना ए गझल".....या पुस्तकाने आमचे महाविद्यालयीन आयुष्यातील कितीतरी दिवस रंगीत केले होते!
तो माहोलच काही वेगळाच होता....प्रत्येक शेर वेगळाच रंग गंध लेऊन यायचा...जरीना सानी यांनी परिश्रम पूर्वक आपल्या सारख्यांसाठी हे पुस्तक लिहीले आहे.

खूप सुरेख पुस्तक आहे...आता का होईना, तुम्ही ते घेतलं हेच महत्त्वाचे!

HAREKRISHNAJI said...

It's really good book. All those years I was using Xerox copy of the same.

Vivek S Patwardhan said...

Harekrishnaji,

Does the book give you marathi meaning of sheroshayari? I get stuck with some urdu words hence this query. I am looking for a good book that gives Ghalib's sher and a commentary in marathi.

You may like to correct my name 'Patwardhan' and not 'Patankar' on your post.

Thanks

Vivek

HAREKRISHNAJI said...

नावामधल्या घोळाबद्द्ल मी दिलगीरी व्यक्त करतो. विवेक पाटणकर नावाचे एक गृहस्थ माझ्या कार्यालयात आहेत.


हे एक अप्रतिम पुस्तक आहे. देवनागरी लिपीत उर्दु शब्द दिलेले असुन त्याचे अर्थ मराठी व आंग्लभाषेत दिलेले आहेत. बऱ्याक ठिकाणी हे शब्द ज्या शेरामध्ये आहेत ते देखील दिलेले आहेत.

सेतु माधव पगडी यांनी गालीबच्या गझला व त्याचे मराठी भाषांतर केलेले आहे, पण ते पुस्तक आता उपलब्ध आहे का माहित नाही.

पण गालीबचे एखादे हिंदी मधील पुस्तक घेतल्यास त्यात कठीण शब्दाचे अर्थ दिलेले असतात. हवे असल्यास मी महंमद अली रोड वर जावुन बघतो.

Ruminations and Musings said...

I have this book.. Must be for ghazal lovers..