Wednesday, September 23, 2009

द बे व्यु आणि ललिता पंचमी

आधीच "द बे व्यु , हॉटेल मरीन प्लाझा " व तिथला बुफे राजाभाऊंचा जिव्हाळ्याचा विषय, त्यात आजच्या " ललिता पंचमी " या ख़ास दिवशी त्यांना तेथे जायला मिळावे ।
राजाभाऊंच्या आवडीच्या ठिक़ाणामधे याचा क्रम फार वरचा लागतो। एक तर बुफे मधले चविष्ट खाद्यपदार्थ, त्यात घर व कार्यालय दोन्ही जवळ असल्यामुळे जाणे सोईस्कर आणि एकाचेच तर एकाचेच वेड हा त्यांच्या स्वभाव असल्यामुळे येथे जाणे तसे बऱ्याच वेळा होते.

समोर पसरल्या अथांग महासागरचे दृष्य पहात आत मधे बुफे मधल्या त्याच सागराप्रमाणे अनंत असणाऱ्या चविष्ट खाद्यप्रदार्थाचा रमतगमत आस्वाद घेणे या सारखे सुख नसावे। (एकदा तर त्यांनी जवळजवळ तीन तास या साऱ्यचा उपभोग घेतला।)

मध्यंतरी याचा दर्जा जरासा खालावल्याचा त्यांना संशय आल्यामुळे त्यांचा स्वभाव खट्टु झाला होता, पण गेल्या महिन्यात तेथे गेले असता एक सुखद धक्का बसला। बुफेचे संपुर्ण रुप पालटले होते, बराच रुचकर बदल झाला होता.





2 comments:

Anonymous said...

हरेकृष्णजी,
आपली पोस्ट वाचली पण बेव्ह्य़ू मध्ये जाणं परवडेल की नाही ते कळत नाही.
मैत्रिणीला घेऊन जायचा विचार आहे....पण जरा त्या बुफेची खिशाला किती चाट पडेल ते सांगितलंत तर मी जाईन म्हणतो...जरा कळवा प्लीज!
लाला.

HAREKRISHNAJI said...

It's Rs.700 all inclusive.

It's worth going on the special occassions with some one special preperrably in the morning. The view is superb.