Tuesday, September 22, 2009

कॅटल क्लास

हा कॅटल क्लास पुर्वीच्या काळी रेल्वे मधुन थर्ड क्लास ने प्रवास करायचा. मायबाप सरकारला त्याची दया आली व त्यांच्या दर्जा वाढवण्याचे त्याने ठरवले. थर्ड क्लास चे डबे काढुन टाकले व सरसकट सेकंड क्लास करुन टाकला.

या क्लास बद्द्ल कोठेतरी वाचल्याचे आठवते। त्या काळात गावांमधे सर्वीस मोटार ची वाहतुक चाले. बहुतेक सर्व गाड्या खटाराच असत. तिकीटाचे दर क्लास प्रमाणे. चढणावर त्या हमखास दगा देत. मग फस्ट क्लास वाले त्या गाडी मधे बसुन रहात. सेकंड वाले खाली उतरुन गाडी मागोमाग चालत रहात व थर्ड क्लास वाल्यांनी गाडी ढकलत वर चढवावी लागे.

विमानात काय करावे लागेल ?

5 comments:

नीरजा पटवर्धन said...

Maaf kara pan please template che clrs badala. bhagabhageet laal ani tyavar nili akshare.. vachayala tras hotoy.

HAREKRISHNAJI said...

I know it's horrible.

Maharashtra Times is to be blamed for this. Navratri , Navrang , Today's colour is Red.

अपर्णा said...

ते जुनं वर्णन एकदम चपखल वाटतय. मी अर्थात कधी तसा अनुभव घ्यायच्या काळात नव्हते पण तरी उगाच त्या काळात जाऊन आल्यासारखं वाटलं...

साळसूद पाचोळा said...

शशी थरुर म्हनुनच म्हनाले असतिल की ईकॉनॉमी क्लास म्हंजे "गुरा-ढोरांचा क्लास"
.

HAREKRISHNAJI said...

अपर्णाजी ,

अगदी खर सांगतो मी देखील त्या जुन्या "गुजऱा हुवा जमाना " मधला नाही हो.

आता माझ्या पिकल्या केसांकडे व सुटल्या पोटाकडे बघुन काही जण आजोबा म्हणुन हाक मारत असले तरी मग त्यांना मला अजुन निवृत व्हायला एक तप आहे हे कळवळुन सांगावे लागते.

सचीन,

शशीभाऊंच्या क्लास काही निराळाच आहे. आता मंत्री झाले आहेत खरे पण ..