Saturday, September 26, 2009

राजाभाऊ आज थोडक्यात बचावले, एकदा नव्हे दोनदा.

राजाभाऊ आज थोडक्यात बचावले, एकदा नव्हे दोनदा.

बस पकडतांना बस सुरु झाली, पायरी वर ठेवत असलेला दुसरा पाय सटकला, व ते खाली पडले, दोन्ही हात बसच्या दांड्याला धरलेले, चालत्या बस बरोबर फरफट.
नशीब जास्त मार लागला नाही। मुका मार आता जाणवु लागला आहे.


रात्री ते व त्यांची बायको शिवाजी पार्क वरुन टॅक्सीने येत असता, फिनीक्स मिल समोरील उड्डाण पुलावर मागुन भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीने त्यांची टॅक्सी जवळजवळ उडवलीच होती, मोठ्या मुश्कीलीने चालकाने ती कंट्रोल केली. नाहीतर ती पुलावर चांगलीच धडकली असती.

आता परत रात्री घराबाहेर पडायला नको।

4 comments:

Mahendra said...

काळजी घ्या... स्पेशली बसमधे चढतांना..

Vivek S Patwardhan said...

Dear Harekrishnaji,

May God give you good health and 'event free' life!

[Now that the serious part is over, you may like to write about the interesting comments of people at home following the incidents!]

Vivek

भानस said...

राजाभाऊ, काय हो?:( बरे आहात ना?

HAREKRISHNAJI said...

प्रिय महेंद्र, विवेकजी आणि भानस,

धन्यवाद.

विवेकजी, या दिवसात देव बसलेले असतात , त्यामुळे ते वाचवायला येवुन शकत नाहीत , तेव्हा आपली काळजी आपणच घ्यायला हवी - इती माझा काका.

देवी आपल्या पाठीशी उभी आहे , दर वेळी ती नवरात्रात प्रचीती देते , आता हेच बघ ......... (या वर्षापासुन सुरु झालेले व्याख्यान आठ-दहा वर्षे मागे जात चालले )- माझे वडिल.