Saturday, August 27, 2022

द बॉम्बे प्रेसीडन्सी रेडीयो क्लब

 आकंठ जेवणे. राजाभाऊंचे पोट कसे नुसते तट्ट फुगले आहे. किती खाल्ले काय खाल्ले याची मोजमापच नाही.

जेवतांनाच त्यांनी ठरवले होते घरी गेले की चार हाजमोलाच्या गोळ्या व दोन इनो घ्यायचे.

काही खास प्रसंग साजरा करण्यासाठी ते आज रात्री अपोलो बंदर येथे असणाऱ्या " द बॉम्बे प्रेसीडन्सी रेडीयो क्लब " मधे जेवायला गेले होते.

यांचे जेवण अतिशय चविष्ट आहे. हा क्लब फक्त सभासदांसाठी आहे. जेवण खुप स्वस्त देखील आहे. रेस्टॉरंटची अंतर्गत सजावटही छान आहे. येथे महोल मस्त असते. 

संध्याकाळ व रात्र फार मस्त गेली.

Peanuts

Wafers

Vergin Mojito

Kingfisher Ultra 

Milkes Seltzer Sparkling Wine

Tandori Prawns

Paneer Tikka

Chicken Adraki Kabab.

Tandoori Aloo Achari.

Boiled Peanuts

Sweet Corn soup.

Paneer in Hot Garlic Sauce

Veg.Fried Rice.

Thin Crust Pizza.

Ice cream

















काय हा माणुस आहे ?

 काय हा माणुस आहे ? 

परवाच्या मध्यरात्री "साई पॅलेस " मधे जेवण झाले. कालच्याला रात्री "गोविंदा" मधे. दोघाच्यामधे भरपुर , अमर्यादित गरमागरम बटाटा भजी (काळेकाकु घरात नाहीत ह्याचा लाभ उठवत ). आधी भरपुर पेढे, उकडीचे मोदक , एकच पिझ्झा व एकच डोन्लट.

मग ते तर व्हायचेच होते.

पोटात उजव्या बाजुला जबरदस्त वेदना सुरु झाल्या. तडफडणे काय हे अनुभवत. रुग्णालयात भरती होण्याची आलेली वेळ.

कशीबसी रात्र सरली. सकाळ झाली. फेसबुक उघडले.

विमान नगर मधल्या "खालसा व्हेज " ची माहिती काढायला सुरवात.

इडली हाऊस

 आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

हाय क़ब्बत तुने इडली नही खायी ! "इडली हाऊस" मधे

स्पर्धेत टिकुन रहाण्यासाठी उडपी उपहारगृहांनी आपल्या मेन्युत आतापर्यंत काय काय, अनेक बदल केले, देशोविदेशाच्या नवनव्या खाद्यपदार्थांची त्यात भर टाकली ( फक्त मराठी खाद्यपदार्थ सोडुन इतर सर्वकाही ) पंजाबी म्हणा, चायनीज, मेक्सीकन, इंटरकॉंटीनेंटल, नवे नवे खाद्यपदार्थ आपल्या ग्राहकांना देण्यास सुरवात केली. अगदी त्यात परत " जैंन " व्हर्जन वेगळॆ.

हे सारे करतांना त्यांचा मुळ बाज, आत्मा केव्हाच हरवुन गेला. 

पण आता एक वर्तुळ पुर्ण झाले आहे. बॅक टु स्वेयर वन.

"इडली हाऊस" मधे फक्त, हो केवळ इडली व तीचे नानाविध प्रकार या आपल्या उपहारगृहात, इडलीप्रेमिकांसांठी, भक्तांसाठी मिळतात.

पंधरा दिवसापुर्वी मी माझा नेहमीचा नियम ,शिरस्ता मोडला. प्रत्येक भेटीत बरेच प्रकार चाखायचे, त्यांचा आस्वाद घ्यायचा हा नियम. पण नेमके त्या दिवशी मला म्हैसुर रवा इडली येवढी आवडली की मी ती खातच सुटलो. मग त्या पुढल्या रविवारी जरासे अपराधी वाटायला लागले.

मग सुरवात केली कांचीपुरम इडलीने. त्यानंतर वाटले आता खोट्टॊ इडली खावी. फणसाच्या पानात लपटलेली ही इडली खाताखाता मुढो इडली खाण्याची तिव्र इच्छा होवु लागली.

केवडयाचा सुगंध आपल्याला नेहमीच मोहवत असतो, मग त्याचा पानात लपेटुन शिजवलेली , केवडयाचा धुंध सुवास लेवुन समोर आलेल्या या इडलीचा रसस्वाद घेतांनाही आपण तसेच बेबंध होत जातो.

आज बकासुराला लाजवायचेच असे मनोमनी ठरवलेले , मग तांदुळ आणि नारळ यांच्या संगतीत खुलुन निघालेली उंडी इंडली आणि त्या नंतर काकडीच्या रसात नटलेली , स्वाद घेवुन बहरलेली काकडी इडली खाण्याचा मोह काहीसा अनावर झाला.

गोड गोड गोड, या गोडावर काहीसा उतारा हवाच . काय खावु, आता काय बरे खावु, हां आत्ता आठवले, पेपर इडली, काळीमीरीचा तिखटसा झणका घेतलेली इडली खावुन मग

"अन्नदाता सुखी भव !"

या साऱ्या इडलींच्या रुबाब, तोरा वाढवावा, लज्जतीत न्यारी भर पडावी म्हणोनी संगतीस मनमुराद मिळाणाऱ्या सांबार, नारळाच्या चटणी बरोबर मोल्गापुडी, लिंबडापुडी तीळाच्या, नारळाच्या तेलाबरोबर दिली जाते.

टिप. येथे अरसिकांसाठी साधी नेहमीची इडली देखील मिळते.

(पुर्वी कधीतरी ब्लॉगवर लिहिलेले.)





मस्तपैकी भरली वांगी.

 आजचा बेत फार फर्मास होता. 

मस्तपैकी भरली वांगी.  या भरल्या वांग्याचा मसाला किती लाजबाब लागतो. त्यात दाण्याचे कुट टाकलेले असले तर वा ! अमॄतानंदच ! 

पण येवढ्याने तिचे समाधान होत नाही. जोडीला पिठले, शेवगाच्या शेंगा टाकुन केलेले, चव आणखी चविष्ट करण्यासाठी माफक प्रमाणात टाकलेली आमसुले. 

नवऱ्याला आणखीन खुळावायचे असल्याने मग यासोबत बाजरीची गरमागरम भाकरी ( तुप आणि, लोण्याचा गोळा सोबत ). लसणाची, शेंगदाण्याची चटण्या. 

आई ग ! तुझ्या हातच्या स्वयपाकाची चव विसरलो ग !

Friday, August 26, 2022

कॅफे मद्रास

 ऐकावे लागते बाबा ऐकावेच लागते. एक तर सर्वांना बंड करणे जमते असे नाही आणि केलेच तर ते यशस्वी होईलच याची खात्री नसते, सर्वांचीच बंड यशस्वी होतातच असे नाही आणि मुख्य म्हणजे बंड करायला हिम्मत लागते ती आणायची कुठुन ? 


आजही माटुंगाभेटीत "इडली हाऊस" ला भेट देण्याची परम इच्छा मनात दाबुन ठेवावी लगली आणि राजाभाऊंची स्वारी वळली नेहमीच्याच "कॅफे मद्रास" कडे.


आज राजाभाऊंना काय झाले होते ते देव जाणे, एवढ्या डोसाचे प्रकार उपलब्ध असतांना त्यांनी डोसा न खाता चक्क इडली मागवली आणि काळेकाकुंनी "अप्पम वीथ स्ट्यु "


 "अप्पम वीथ स्ट्यु" बऱ्याच वर्षानी खाल्ला. अप्पम मस्त होते. "स्ट्यु" काही फारसा भावला नाही पण सोबत मसाला डोसामधली बटाटा भाजी असल्यामुळे बहार आली.


नेहमीच शेवट "कापी" नी व्हायलाच पाहिजे हे एक शास्त्र असते.











रोजे सोडायला जावे फिरनी खायला

 


क्रिस्पी व्हे. मधा मधे

 खादाड मामानी एकट्यानेच सारे हडपले, इतर मामाचे तोड बघत बसले. क्रिस्पी व्हे. मधा मधे

आधीच मामा खादाड, त्यात भाच्याची त्याला साथ








गोवर्धनमय

 हल्ली आम्ही "गोवर्धन" मय झालो आहोत.

गोवर्धनचे गुलाबजामुन.

अमुल ला गोवर्धन चांगलाच टकरा मारु लागलेला दिसतोय. बऱ्याचश्या मॉलमधे हल्ली गोवर्धनची उत्पादने ठळकपणे दिसु लागली आहेत.

पुणे-मंचर प्रवासात ह्यांच्या कडे थांबणे होतेच होते.




श्री खारा कुवा सार्वजनिक प्याऊ झवेरी बाजार

 




Street Food at Mumbadevi.

 Street Food at Mumbadevi. ( havn't tasted it so far )






बनमस्का, ब्रुनमस्का खावा तर याझदानी बेकरीतच

 बनमस्का, ब्रुनमस्का खावा तर याझदानी बेकरीतच







प्रकाश दुग्ध मंदिर

 स्वातंत्रदिन साजरा करायला म्हणुन राजाभाऊ भल्या सकाळी घरातुन बाहेर पडले. 

पहिला पडाव. प्रकाश दुग्ध मंदिर मधे. साबुदाणा वडा व पियुष.

दुसरा पडाव. मुंबादेबी जलेबीवाला. अफाट गर्दी असल्यामुळे केवळ तळण्यात येणाऱ्या जिलेब्या बघुन समाधन मानावे लागले.

तिसरा पडाव. विनय हेल्थ होम. पण ते बंद होते. पैसे वाचले म्हणायचे.