Saturday, April 19, 2014

चित्रा-चंद्राचे दांपत्य

चंद्र रोहिणीप्रमाणॆच चित्रेशींही अगदी निकट सहवास करतो. म्हणजे चित्रा ही सुद्धा त्याच्या आवडत्या रमणींपैकी एक धरायला हरकत नाही. रोहीणी आरक्त तर चित्रा किंचींत हरिता. दोघीही आपापल्यापरी मनमोहिनी. चित्रा-चंद्राची युती मी अनेकवार पाहिली आहे. एखाद्या वेळी तिचा पती क्षीण हिऊन तिच्या घरी येतो आणि ती जणू "नीचैर्गच्छत्पुपरी च दशा चक्रनेमित्रमेण " या शब्दांनी त्याला धीर आणि आश्वासन देते. ज्या वेळी तो सकल कलांनीं संपन्न होऊन तिला जवळ करतो, त्या वेळी ती वल्लभा बनून त्याच्याशी खेळीमेळी धरते.

चैत्र पोर्णिमेला होणाऱ्या चित्रा-चंद्राच्या समागमाचा दृष्टांन्त घेऊन दिलीप-सुदक्षिणेचा गौरव करतांना त्या रसिकावतंस कालिदासाने जो श्लोक लिहिला तो संस्कृत वाड्ग्माला भूषणभूत असा आहे

दिलीप आणि सुदक्षिणा. दोघेही एकाच रथातून जाणारी. दोघांचाही शुद्ध वेष. जणू हिमवृष्टीतून मुक्त झालेले चित्रा-चंद्राचे दांपत्य. त्यांची शोभा वर्णायला शब्द कुठून आणायचे !

"नक्षत्रलोक " पं. महादेवशास्त्री जोशी .

No comments: