जशी जशी मत देण्याची , कोणाची तरी एकाची निवड करण्याची घडी जवळ येवु लागली तशी तशी राजाभाऊंच्या मनाची चलबिचल फार वाढायला लागली.
नवे की जुनेच ? जुनेच का नव्यात आणखीन कोण ? जुन्याचा आलेला कंटाळा, नव्यांना जवळ करायचे धाडस होत नाही. डावीकडे वळावे की उजवीकडे , निर्णय होता होत नव्हता.
मग पुर्ण विचाराअंती राजाभाऊ जुन्याकडे वळले.
निवड करायची होती अंम्बा भवन व रामाश्रय मधे.
रामाश्रयमधे सकाळी अफाट गर्दी असते, प्रामुख्याने गुजरातींनी हा भाग काबीज केलेला , मग तेथे जाणे नकोशे व्हायला लागले होते. सगळा गडबड गोंधळ, आरडाओरडा.
पण आजची वेळ दुपारची होती, त्या मानाने गर्दी तशी माफकच असणार करत मग राजाभाऊ येथे नीरडोसा खायला गेले.
गरमागरम रसम, वाटीभर. नीर डोसा. पायनापल शिरा आणि ऑनीयन रवा डोसा. शेवटी कापी.
अखेरीस एक मात्र खरे , जुने ते सोने.आपले नेहमीचेच बरे. आपले ते आपलेच.
No comments:
Post a Comment