राजाभाऊंची पाऊले मंत्रमुग्ध अवस्थेत जेव्हा वळली तेव्हाच त्यांच्या बायकोला होणाऱ्या संभाव्य धोकयाचा अंदाज आला, आता राजाभाऊ नक्की काय करणार आहेत ते तिला चांगलेच ठावुक होते, अश्या जागी गेल्यानंतर, चांगलासुरका फ्रेश माल बघितल्यावर राजाभाऊ कसे पिसाळतात, त्याच्या येणाऱ्या सुवासाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो, ते कसे वेडेपिसे होतात, हे घेवु की ते घेवु , हे खावु की ते खावु करत रहातात हे ती जाणुन होती.
कर्वेनगर , नवसह्याद्रीत भटकतांना राजाभाऊंची नजर आपसुकच गणॆश भेळी जवळ नविनच आलेल्या एका पॉश दुकानाकडॆ वळली.
आधी नजर वळली आणि मग पावले.
त्या दुकानाच्या मालकाने आधी गोड बोलुन त्यांचे मन काबीज केले आणि मग त्यांचे पोट.
ताजी खुशखुशीत बिस्कीटे आणि केक.
ह्याची चव दाखवा, त्याची चव दाखवा, हे एक पाकीट द्या आणि त्याचे एक, पिळाची खारी दोन पाकीटे, कप केक चार, नानकटाई बांधा, जीरा बटराची चव मस्त आहे, ती द्या, स्विस खारी हा काही तरी नवा प्रकार दिसतोय, बरं मग ती पण द्या. मग पुतणीच्या नावाखाली अगं तिला श्रुजबेरी आवडतात ती घेवुया , तिला आणखी काय काय आवडते करताकरता , राजाभाऊंच्या मुलाचे नाव त्यांनी पुढे केले, त्याच्या साठी ही ट्रूटीफुटीची बिस्कीटे घेवु करता करता ही अशी यादी लांबत चालली.
आपल्या नवऱ्याला कशी वेसण झालायची ते ह्या बायकांना चांगले ठावुक,
आता उरलेली बिस्कीटे पुढच्या भेटीत.
नाशिकच्या जहागिरदार बेकर्सनी पुण्याला दुकान उघडले आहे.
7 comments:
kuthe ahe te dukan te nakki sanga ki rav !
sapadala patta tumchi post parat nit vahclyvar - sorry ha !!
pan patt dilay baddal dhanywad !!
hmm nice!
nasikla hi asa anubhav yeto..
Vikram,
How was it ?
Yog.
I liked this bakery very much.
Dhanyavad Mr Priyadarshan Kale
Gajanan Bapat
Bapat & Co Karve Nagar Pune.
Bapat Saheb,
Service ani product baddal shanka tar nahi. Pan product test karayla yave lagel.
Sachin Khairnar.. Mumbai
Its great Bapat. Once again you open a good outlet.
Sachin Khairnar.
Mumbai
Post a Comment