(Sample of roads in Dubai and AbuDhabi)
म. टा. प्रतिनिधी वाहनचालक दारूडे, बेशिस्त, म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला वाढीव काम करावे लागते आहे... जानेवारी ते ऑगस्टपर्यंत केलेल्या कारवाईत 'नो पाकिर्ंग'च्या ४,५९,२४० केसेस नोंदवल्या गेल्या; तर, मद्यपी ड्रायव्हरांविरोधात हाती घेतलेल्या खास मोहिमेचा आकडा ७८६१ वर पोहोचला आहे! नो पाकिर्ंग, अतिवेगाने जाणाऱ्या गाड्या, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे अशा गोष्टींवर वाहतूक खात्याचे पोलिस बडगा दाखवत असतात. मात्र, प्रामुख्याने खासगी वाहनचालकांची 'चलता है' ही मनोवृत्ती पुन्हा दिसते.
मला वाटते -
जर केवळ आठ महिन्यामधे वाहतुक संबधी नियम/कायदे मोडणाऱ्यांची संख्या लाखोंच्या (१,००८,५४०) घरात जात असेल, तर मग तो दोष केवळ नियम भंग करणाऱ्यांचा असेलच असे नाही. त्या कायदा मधे सुध्या त्रुटी असु शकते त्या मधे सुधारणा, फेरविचार करण्याची गरज असु शकते.
कुठेतरी कोपऱ्यात उभे राहुन, गाडी आड लपुन राहुन, नियम मोडण्याची वाट पहात राहत मग गाडी चालकांना पकडुन, त्यांच्या कडुन तडजोड शुल्क (दंड) स्विकारण्या पेक्षा जर वाहतुक पोलीस सर्वांसमोर दिसेल असे, आपले अस्तिव जाणवुन देत उभे राहीले तर नियमभंग करणाऱ्यांची संख्या नक्कीच कमी होण्यास हरकत नाही. मध्यंतरी पुण्याच्या सकाळ मधे एक लेख वाचल्याचे स्मरते. वाहतुक पोलीसांना तडजोड शुल्क स्विकारण्याचा अधिकार नाही, तो फक्त आरटीओ अधिकाऱ्यांना व कोर्टालाच आहे.
मुंबईची लोकसंख्या बेसुमार वाढली आहे, वाहने विकत घेणे ही आता केवळ गर्भश्रीमंतांची चैन राहीलेली नसल्यामुळे रस्तावर आलेल्या गाडयांची संख्या तर कैक पटीत फोफावली आहे. त्या तुलनेने गाडया उभ्या करण्यासाठी जागा वाढवल्या गेलेल्या नाहीत, आपल्या शहरनियोजनात हे सारे बसत नाही. परत गाडया उभ्या करण्याच्या जागा ठरवल्या गेलेल्या आहेत कैक वर्षापुर्वी, त्यात नवीन भर पडलेली नाही, मग गाडी चालकांनी गाडया उभ्या करायच्या कोठे ? मुंबईतील नेहमीच होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता वहान चालवणे हे काही आराम दायक राहीलेले नाही. लक्ष विचलीत होणास मोबाइल प्रमाणे गाडीत लावली गेलेली गाणी, शेजारी बसलेल्या व्यक्तीपाशी संभाष्ण करणे, वाहनचालकांसाठी लावले गेलेले जाहीरातीचे साईन बोर्ड वाचणे हे देखील कारणीभुत असतात.
मद्यपी चालक , बेदरकार चालक, बेफाट वेगाने वहान हाकणारे मस्तीखोर, मिजासखोर चालन यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई व्हायलाच हवी या बद्द्ल दुमत नसावे. त्यांनी व इतरांनी, दुसऱ्यांच्या सुरक्षीततेला धक्का लागला जावु शकेल असे गुन्हे करण्यास धजवता कामा नये.
सिग्नल जवळील पांढऱ्या पट्यावर गाडी थांबवु नये हा एक नियम, पण परत अफाट रहदारी असणाऱ्या शहरात हे जरा जडच जाते. दुबईत चौकापलीकडली वाहतुक, रहदारी, सुरळीत नसेल, जर तेथे वहाने उभी असतील, जरी तुमचा हिरवा सिग्नल चालु असेल, तर वहान चौकात आणण्याची परवानगी नाही. चौकात वहाने अडुन रहाता कामा नये. पण आपल्या कडे वहानांची संख्या व रत्याची रुंदी व परिस्थीती लक्षात घेता हे जरा जडच जाणार आहे. हेल्मेट चा वापरासंबधीच्या सोयीगैरसोयी, त्या पासुन मिळणारी सुरक्षितता या विषयी सुरवातीच्या काळात वर्तमानपत्रातुन बरीच चर्चा झाली होती. हेल्मेट न घातल्यामुळे दंड भरणाऱ्यांची संख्या २,५१,००० आहे. दुसऱ्यांच्या सुरक्षीततेच्या विचार करता अकस्मात लेन तोडु नये, पण योग्य कारणासाठी, योग्य रितीने ही लेन बदलल्यास ? या रस्तावर नक्की किती वेग मर्यादा आहे ? हे कधी वाहान चालकाला स्पष्ट पणे कळणे कठीण असते. त्याची जाणीव करुन देण्याच्या पाटया रस्त्यावर व्यवस्थीत लावल्या गेल्या पाहीजेत.
लायसन्स नसणे, रिन्यु न करणे यासाठी जर लोकांची सोय लक्षात घेता ती देण्याची पद्ध्यत, जागा बदलली तर याचे प्रमाण नक्कीच कमी होईल. सर्व वाहतुक चौक्या संगणाकाने मुख्य कार्यालयास जोडणे, संगणीकरण करणे, तुमच्या घराजवळील, कार्यालयाजवळील वाहतुक चौकीत परवाना देण्याची, नुतनीकरणाची सोय करणे, याचा विचार करायला हवा.
दुसरा मुद्दा म्हणजे अनेक ठिकाणी वाहतुक पोलीस चौकी हातभर अंतरावर असतांना सुद्ध्या, किंवा सतत पोलीस त्या चौकात मौजुद असतांना सुद्ध्या अनेक बाबीं कडॆ दुर्लक्ष कसे काय केले जाते ? उ.दा. चर्चगेट ला इरॉस चित्रपटगॄहाच्या बाहेरील परीसर, अगदी बसथांब्यावर देखील सर्रास गाडया उभ्या केलेल्या असतात, वीर नरीमन चा पिज्झेरीयाचा कोपरा, पदपाथ वाहने उभे करण्यास दिलेला ? इं. आणि पोलीसच जेव्हा वाहतुक नियम मोडतात तेव्हा ? कितीतरी मुंबई पोलीस, वाहतुक पोलीस हेल्मेट न घालता दुचाकी वाहन चालवताना रस्तात दिसतात, त्यांच्या गाडया बेलाशक कोठेही वळताना उभ्या केलेल्या, वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने जाताना दिसतात
गरज आहे ती आंतरराष्टीय दर्ज्याचे रस्ते निर्माण करण्याची, सुखसुविधा पुरवण्याची, सिग्नल व्यवस्थेचे आधुनीकीकरण करण्याची. पोलीस आणि वाहनचालक या दोघांची ही मानसीकता बदलण्याची.
आणि हे सर्व होत असतांना पादचाऱ्यांच्या सुरक्षीतचेचा, प्राथमिकतेचा विचार त्यांना अग्रभागी ठेवुन करण्याची गरज आहे.
एक माझा अनुभव. मी यामाहा वर. स्थळ चर्चगेट, इरॉस जवळचा सिग्नल, नुकताच पहीला पाऊस पडुन गेलेला, रस्ता निसरडा झालेला, सिग्नल अंबर झालेला, मी काळ्यापाढऱ्या पट्यावर, रस्तापार करणाऱ्यांची संख्या अफाट, क्षणभरात समोरील वाहतुक सुरु झालेली, माझ्या पुढे पर्याय दोन नियम पाळण्यासाठी पादचारी व मी व इतर वाहक यांचा जीव धोक्यात घालत न थांबता पुढे निघुन जाणे, कारण अवधी फारच थोडा किंवा दुसरा पर्याय, आहे त्या जागी उभे रहाणे. मी दुसरा पर्याय निवडला. त्या दिवशी श्री. राजु परुळकरांनी त्यांच्या लेखात ( लोकप्रभा १६.१०.०७) म्हटल्या प्रमाणे "कोटा " पुर्ण होणे असेल, मला व असंख्य वाहन चालकांना दंड भरायला लागला.
प्रसंग दुसरा, स्थळ दुसरे, मी व यामाहा तीच. प्रसंग ही जवळजवळ तसाच. पण मी अनुभवाने शहाणा झालेलो. मी मागचा सिग्नल लाल होण्यापुर्वी पार केलेला. चौकात तर थांबचचे नसते, येत नाही, वाहतुक अधीकाऱ्यांनी मला दंड भरायला लावला. अखेरीस ते जे म्हणतील तेच खरे. बहुधा केवळ वाहतुकीसंबधी नियम तोडले तर अपील करता येत नसावे.
प्रसंग तिसरा -मी सिग्नल चक्क इतरांबरोबर तोडला, आम्हाला सर्वांना दुचाकीवहाने बाजुला घ्यायला सांगीतली. मी तत्काळ गुन्हा कबुल केला. दंड भरतो सांगीतले व या गुन्हासाठीचा रु. १०० दंड भरण्यासाठी दिले. पावती मागीतली. थांबा. थोडया वेळाने रु. ५०. परत मिळाले.
नियम मोडणाऱ्यांची संख्या
नो पार्कींग ४,५९,२४०
वेगमर्यादा ओलांडणे ९,९००
सिग्नल तोडणे १,५५,०००
लेन तोडणे ५८,०००
मोबाइलवर बोलताना चालवणे १८,०००
हेल्मेट न घालणे २,५१,०००
सेप्टी बेल्ट न वापरणे २१,४००
नंबर प्लेट संबधी १८,०००
लायसन्स नसणे, रिन्यु न करणे १८,०००
एकुण १,००८,५४०