Friday, September 30, 2022

सुजाता

 सुजाता . 

बायका आपल्या नवऱ्यावर बारीक लक्ष ठेवायला आजकल फेसबुकवर आपलं खातं खोलतात असा राजाभाऊंना दाट संशय आहे.  हेरगिरी निव्वळ हेरगिरी.

आपला नवरा आज कुठे  हादाडायला गेला होता हेच , केवळ हेच जाणुन घेण्यासाठी तर काळेकाकूंनी हा सारा खटाटोप तर मांडला नसावा ? 

आज येथे जेवतांना राजाभाऊंना नक्की खात्री होती , आपली बायको आपल्यावर नक्कीच ओरडणार. पण त्यांना खात्री होती की हे ओरडणे काहीसे वेगळे असेल. 

का जेवायला बाहेर गेला च्या ऐवजी एकटा का येथे जेवायला गेलास   ?

आजकालच्या जमान्यात मुंबईमधे मराठमोळं भोजन मिळेल अशी उपहारगृह राहिली आहेत तरी कुठे ? हातांच्या की हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी. ठाकुरद्वारचे "सुजाता उपहार गृह " (पुर्वश्रमीचे बी. तांबे ) मात्र आपला चेहरामोहरा अजुनही शाबुत ठेवुन आहे.

"आलोच " म्हणुन राजाभाऊ जे गायब झाले ते पोचले थेट "सुजाता" मधे. दोन वाट्या घट्ट गोड दही, दोन वाट्या चवदार , रुचकर आमटी आणि बटाटा सुकी भाजी खायला.  हा सारा पसारा मांडला गेला होता ते केवळ "डाळींबी" साठी.

ताट.  

ताटात दोन भाज्या आपल्या आवडीप्रमाणे. जवळजवळ ७-८ भाज्यांमधुन निवडायच्या.  मग त्यासोबत आमटीभात,  दही आणि समाधान.

हे समाधान शेवटी सत्य.





खासा बेत. घरीच.

खासा बेत. घरीच.


मलाई कोफ्ता

हराभरा कबाब

पुलाव

गाजर का हलवा





डाळींब्या, बटाटयाची सुकी भाजी आणि मस्तपैकी आमटीभात. वरती घट्ट दही.

 डाळींब्या, बटाटयाची सुकी भाजी आणि मस्तपैकी आमटीभात. वरती घट्ट दही.

ता.क. तळलेल्या पुऱ्या खाल्याबद्दल राजाभाऊंनी मग आणखीन काहीतरी खाल्ले

मध्यंतरी राजाभाऊंना त्यांच्या एका स्नेह्यानी विचारले, तुम्हाला सर्वात जास्त जेवण कुठुनचे आवडते. 

नाही सांगता आले.

ठाकुरद्वारच्या "सुजाता" मधे आपलं जेवण जेवतांना मग जाणवले हे जेवण आपल्याला खुप आवडते. 





भुट्टेवाले भैय्या

 योगायोग निव्वळ योगायोग. गायब झालेले हे भुट्टेवाले भैय्या अचानक समोर आले. 

हे पुर्वी रॉक्सी चित्रपटगृहाच्या समोर बसायचे. कधीतरी येता जाता मग राजाभाऊ "भाजुन उकडलेले कणीस " खायचे. मग ते  गायब झाले. 

मक्याचे कणीस आधी शेगडीत खालच्या भागात सालांसकट भाजतात, मग वरती निखाऱ्यावर. सालं काढुन मग परत भाजणे.

कणासाचे दाणे सोलून झाले की मग एकदोन चमचे अमुल बटर, लिंबु आणि वरती दोन प्रकारचे भुरभुरलेले मसाले. चव अगदी उकडलेल्या कणसासारखी लागते.











पातोळी. राममंदिर, वडाळा

 



द ऑर्किड

 कालच्याला राजाभाऊंनी एक गडबड घोटाळा करुन ठेवला. चष्मा खाली गाडीत विसरले आणि "मोस्टली ग्रीलस" ह्या श्री. विठ्ठल कामतांच्या "द ऑर्किड" मधल्या रेस्टॉरंट मधे जेवायला गेले.

खरं तर हे गच्चीवरील मेक्सीकन फुडचे रेस्टॉरंट. त्यात जावुन जावुन मागवले काय तर तंदुरी पॅटर, आणि आपलं नेहमीचच पनीर तिक्का मसाला, माखनी डाळ आणि भात. करणार तरी काय, मेन्युमधे काय काय पदार्थ आहेत हे वाचताच येत नव्हते. आणि तेथे सुरु असलेल्या संगीतामुळे दुसऱ्या कोणाशी बोललेले ऐकु येत नव्हते. 

राजाभाऊंना वाटले होते की त्यांना "बुलेवार्ड " या बुफे जेवण मिळत असलेल्या रेस्टॉरंट मधे जायचे आहे. राजाभाऊंचे हे एक आवडीचे ठिकाण. सात माळ्यावरुन खाली पडणाऱ्या पाण्याच्या भवती असलेले. त्यांचा स्प्रेड ही जबरदस्त आहे. 

आधी ते  "बुलेवार्ड " मधे जावुन पोचले, सर्व खाणॆ पाहुन वेडेपिसे झाले. काय खावे, किती खावे याचे आराखडे मनाशी तयार होत असतांना उठुन दुसरीकडे जायला लागले आणि पनीर तिक्का मसाला खायला लागले.







आपली प्रथा आहे ना देवाला प्रसाद दाखवल्यानंतर मग तो आजुबाजुच्या लोकांना वाटण्याची.

 जेथे " घ्या " म्हटंल्यानंतर आपसुकपणे घेण्यासाठी हात पुढे होतोच तेथे राजाभाऊ नेहमीच ठामपणे नकार देत आले आहेत.

"नको" . स्पष्ट बोललेले बरे. 

पण आज राजाभाऊ जरा जवळपास घुटमळत राहिले, जास्तच काळ रेंगाळत राहिले

नाही म्हटलं, आपली प्रथा आहे ना देवाला प्रसाद दाखवल्यानंतर मग तो आजुबाजुच्या लोकांना वाटण्याची.




खा मेल्या खा. उपाशी आहेस ना.

 राजाभाऊंनी "तोंड दाबुन बुक्काचा मार " ही म्हण ऐकली होती. 

आज त्यांच्या अपराधाबद्दल त्यांना " तोंड उघडुन श्रीखंड पुरी चा मार " खावा लागला.

अपराध काय तर एकटेच गेले आणि काय काय खाल्ले ह्या प्रश्नाचे सरळपणे उत्तर देणे नाही.

मग काय. 

त्यांनी किती खाल्ले, त्यांचे पोट कितपत रिकामे आहे हे सारे जाणुन घेण्याचा एक सोपा मार्ग . नेहमीपेक्षा जास्त जेवण राजाभाऊंना वाढणे.

खा मेल्या खा.  उपाशी आहेस ना.

उदरभरण नोहे जाणीजे हे यज्ञकर्म.

 उदरभरण नोहे जाणीजे हे यज्ञकर्म.













ऑपरेशन राम आश्रय

 ज्या सेनापतींनी " हल्लाबोल " आदेश दिले  तेचनेमके ऐन वक्‍ताला गायब झाले. काहीश्या नाराजगीनी का होईना पण मग त्यांच्या इतर साथींनी खिंड लढवण्याची ठरवली. 

"ऑपरेशन राम आश्रय " . 

महेंद्र कुलकर्णींनी साद घातली आणि सुहास, आनंद, दिपक , ज्योती , आणि राजाभाऊ या सर्वांनी ह्या मोहिमेत भाग घ्यायचा ठरवला.  त्यांच्या वाटेत अनेक अडचणी आल्या, अनेक जण त्यांची वाट अडवुन पुढे उभे होते पण त्यांनी कशालाही न जुमानता , अनंत काळ प्रतिक्षा करत  आपले घोडे पुढे दामटवले. अखेर अन्नपुर्णादेवीला त्यांची दया आली आणि त्यांना बसण्यासाठी एकदाचे का होईना मेज मिळाले.

आधीच पोटात अग्नी चांगलाच प्रज्वलीत झाला होता, वरती त्याला चेतवण्याचे काम गरमागरम तिखट तिखट रसम नी करायला सुरवात केली. 

राजाआधी भालदार ,चोपदार यायला लागले. नीर डोसा यायला जरा उशीर लागणार होता

पहिल्यांदा पोटातिर्थी पडलं  ते पोंगल अविअल . त्याचा फडशा पाडायला फारसा वेळ लागला नाही. बघता बघता ते गायब झाले.  

आता  पुढे  काय  ? ही मधली जागा कशी भरुन काढायची ? मग " शीरा उपमा मिक्स " म्हणाले आम्ही आहोत ना. "नय्यप्पन " म्हणाले आम्ही काय पाप केले आहे. 

 हं. ह्याचा खात्मा झाला 

मग अखेरीस झाले आगमन नीर डोश्याचे. सोबत लाल चटणी, नारळ, गुळाची चोय आणि सांबार.  

शेवटी हा चेतावलेल्या अग्नी शांत करायला त्यात कापी ओतावी लागली. 

पण हा अग्नी खरच शांत झाला का ? 

का त्यात पायनापल शिरा आणि बदाम शिऱ्याची आहुती द्यायला लागली ?

रोहन , तुझी उणीव भासली खरी.






तिवारी ब्रदर्स

 तिवारी ब्रदर्स


विसर्जनाची मिरवणुक सुरु असते. तहानभुक हरपुन आपण ती पहात असतो. फोटो काढण्यासाठी धडपडत असतो. मग कधी कधी रस्तावर दोन मोठे गणपती येण्यामधे गॅप पडली असते.

अशा वेळी.

आपल्याला भुक लागली आहे याची जाणीव होते.

आणि मग.




Thursday, September 22, 2022

हिचकी

 महंगाईके जमानेमे ये चमत्कार ?


"हिचकी" ह्या रेस्टॉरंट मधे दर मंगळवारी १९९० च्या दशकातल्या भावामधे सर्व खाद्यपदार्थ मिळतात.


लुट लो, राजाभाऊ लुट लो.


दोन मॉकटेल्स

व्हे.क्रिस्पी 

व्हे.फ्राईड राईस

स्वीट ॲड सार ग्रेव्ही.


बिल फक्त रु. ५८८.००

महाराजा भोग

 गेले काही दिवस रात्रंदिवस राजाभाऊंचा डोक्यात सतत "राजा, महाराजा " हे दोन शब्द एवढे घोळत होते की जेव्हा आज भोजनमैफल कुठे जमवायची याचा विचार करताक्षणी त्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव आले  ते म्हणजे " महाराजा भोग "

ही निवड अगदी चपखल जमली.  जिच्या साठी हा त्यांनी आज "अलविदा समारंभ " ठेवला होता तिला हे जेवण खुप आवडल्याचे बघुन आज राजाभाऊंना समाधान वाटले. येथे जेवण मस्तच असते. "महाराजा भोग " मधे जाण्याची ही तिसरी वेळ. 

आज येथले चार पदार्थ खुप आवडले.

डालपकवान, मेथीचे ठेपले, मिरचीचा फुलका, आणि मुगाच्या डाळीची खिचडी. येथेले वाडपीपण सेवेसी तत्पर असतात. पानातील एखादा पदार्थ संपतो नं संपतो तोच तो पदार्थ तुमच्या थाळीत पडतो. यांच्या सरबाईमुळेच मन प्रसन्न होवुन जाते.

त्यात परत आज " डालपकवान " होते.  ह्या योगायोगाचे त्यांना आश्चर्य वाटले. हा पदार्थ खायला जाण्यासाठी त्यांच्या एका स्नेह्यांनी त्यांना बोलवले होते.





मोदक

 Suranga Daté  यांनी मोदकप्रिय राजाभाऊंच्या एका पोष्ट वर चविष्ट कविता रचली आहे

राजाभौंनी हंड्ब्रेक सोडला , गाडी गियर मध्ये टाकली,

आणि एकदम थबकले ....

गूळखोबरं -किसमिस -इलायची च्या वासाने वेडे झाले

आणि क्लचवरचा पाय निघाला .....

हात हळू हळू डब्यापर्यंत गेले ,,,,,

मोद्क्मय मन ,

मोद्क्मय डोळे ,

मोद्क्मय नाक,

हात शिवशिवले .

अचानक विचार आला,

बाप्पा साठी किती लोक मोदक करतात ,

छोट्या मुलांचे प्रायोगिक मोदक ,

मोठ्या मुलीनी केलेले मोदकाचे मनापासून प्रयोग,

गृहिणीने केलेले उत्क्रष्ट जिन्नस,

काही कलाकृती, काही ओबडधोबड ,

काही श्रद्धेने काठोकाठ भरलेले, मुलांपुर्तेच पर्व्डलेले ,

आणि काही सज्जन गृहस्थांनी

आपापल्या दुकानात बायकांना मदत म्हणून ठेवलेले मोदक.

बाप्पा ला हे खाउ का ते खाउ , असे होत नसेल का ?

बाप्पाच्या तोंडाला पाणी सुटत नसेल का ?

हावरट उंदीरमामाना ब्रेक लाउन, बाप्पाने मनाला आवर घातला असेल.... 

राजाभौन्चा हात परत गाडीच्या चाकावर आला,

मोदकांच्या डब्यांनी सुटकेचा निश्वास टाकला ,

किल्य्या फिरल्या , क्लच दाबले गेले,

गाडीनी वेग धरला ,

आणि सर्व मोदक सुखरूपपणे वहीनीन्च्या पर्यंत जाउन पोचले..

दो आंखे बारा हाथ

 दो आंखे बारा हाथ. दोन. डोळ्यांचा तो धाक.

लालच. मोह. माया.

कोण बघते आपल्याला ? कोणाला कळेल ? काय बिघडते ? बाप्पा तर आपलाच आहे, तो समजुन घेइल. 

एकटे राजाभाऊ. गाडीत. सोबत चार. 

चार डबे . उकडीच्या मोदकांनी भरलेले. गरमागरम. नुकतेच असे तयार होवुन बाहेर पडलेले.

लालच. लालच. आत्ता. आत्ताच्या आत्ता. एकच फक्‍त एकच. कोणाला कळणार पण नाही. 

पण राजाभाऊंनी स्वःतावर ताबा ठेवला.

ते दोन डोळे कोणाचे ?




ले लो भाई चना ले लो

 ले लो भाई चना ले लो



माफक अपेक्षा

 कोणत्याही उपहारगृहात राजाभाऊ गेले की त्यांची एक माफक अपेक्षा असते. टेबल व बाक एकामेलाला जोडलेले नसावे, वेगवेगळॆ असावे. नाहीतर पंचाईत होते. टेबल आणि बाकामधे आपले पोट चेपुन चेपुन बसवायला लागते.

बकासुर ह्या एवढ्या मोठ्या पानावर जेवत असेल काय ?

 बकासुर ह्या एवढ्या मोठ्या पानावर जेवत असेल काय ?





तिवारी, एकाच वेळी दोन दगडांवर पाय

 एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवायला गेलं तर अर्धवट उपाशी रहाण्याची पाळी येते.

ऑपेरा हाऊसला "तिवारी " कडे एक सामोसा खाल्यानंतर खस्ता कचोरी किंवा राज कचोरी ( नावात कदाचीत गडबड असेल ) खाण्याचं मनात होते. पण अचानक दुसऱ्या एका ठिकाणाची आठवण झाली आणि राजाभाऊ दुसरे काहीही न खाता तेथुन निघाले.

पण 

पण वेळेअभावी दुसरीकडे खाणॆ नाही जमले. दोन केळ्यांवर समाधान मानावे लागले.







तुका पाव होया का रे

तुका पाव होया का रे 

काळेभाऊ म्हणे "देवा मला पाव "

वत्सा, जा गोव्याला जा, पावच पाव खा , अगदी मनोसोक्‍त खा. 







भाजी व पाव

 राजाभाऊ पणजीत एका उपहारगृहात गेले. आजुबाजुच्या लोकांनी ही भाजी व पाव मागवल्याचे पहिले व राजाभाऊंनी तेच खाण्याचा निर्णय घेतला. आणि ते ह्या डिशच्या प्रेमात पडले.




Saturday, September 17, 2022

राजाभाऊ आणि गरमागरम पातोळी.

 जे जे आपल्या भक्ताला आवडते ते ते लंबोदराला आणि जे जे लंबोदराला आवडते ते ते त्याच्या भक्ताला, आणि म्हणुनच भक्ताला बाप्पा प्रिय असतात आणि बाप्पाला भक्त.

भक्तानी मनोकामना करावी आणि बाप्पानी त्याला ते मनोसोक्‍त खाऊ घालावे आणि ते ही गरमागरम.

राजाभाऊ राम मंदिर मधल्या सुरेख मुर्तीचे दर्शन घेवुन बाहेर काय येतात आणि समोरुन एक गृहस्थ हळदीच्या पानाच्या पातोळ्यांनी भरलेला थाळा काय घेवुन येतात.

गरमागरम पातोळी आणि राजाभाऊ.

राजाभाऊ आणि गरमागरम पातोळी.




कोकणस्थ

 केव्हातरी आपला अंदाज चुकला, आपल्याला जे वाटले होते ते चुक होते ह्याची जाणीव होते तेव्हाचा तो क्षण आनंदाचा देखील असु शकतो.

आज दुपारी राजाभाऊ आपल्या सहकाऱ्यांसमवेत "कोकणस्थ" मधे भोजन करावयास गेले होते. 

जेव्हा "कोकणस्थ" हे भोजनगृह उघडले तेव्हा राजाभाऊंच्या मनात एक अनिष्ट शंका होती, साशंकता होती,त्यांना भीती वाटत होती की आजुबाजुच्या धंदेवाईक बार कम रेस्टॉंरंटच्या गराड्यात हे मराठमोळं, गृहिणींच्या हातचे उत्तम, चविष्ट, घरगुती  जेवण मिळणाचे ठिकाण कितपत तग धरु शकेल ? त्यात परत ते जरा आतल्या बाजुला, त्याची जाहिरात नाही, हे आता किती दिवस चालेल ?

पण आज बऱ्याच दिवसांनी राजाभाऊं "कोकणस्थ" मधे जेवायला गेले तेव्हा ते खुप खुष झाले, आतली गर्दी पाहुन. जवळपासच्या कार्यालयातील कर्मचारी येथे जेवायला आले होते. बसायला जागा नव्हती.  एकंदरीत "कोकणस्थ" नी चांगले बस्तान बसवलेले दिसले, चांगले चाललेले दिसले. 

आता शाकाहारी जेवणाबद्दल परत काय बोलायचे. किती तारीफ केली तरी थोडीच.

राजमा, वडे, बटाटाभाजी, चटणी, श्रीखंड आणि बढीया वरणभात. साधे फोडणीचे वरण आणि उत्तम प्रतीचा तांदुळ असलेला भात.  

परत कधी तरी सहकुटुंब सहपरीवार  येथे जेवायला जाण्याचा बेत ठरतोय


(ही पोस्ट जुनी आहे. हे उपहारगृह अजुन चालु आहे का माहिती नाही. )