Sunday, July 31, 2011

विक्रम , वेताळ आणि मुंबईच्या रस्तावरचे खड्डॆ.

विक्रम , वेताळ आणि मुंबईच्या रस्तावरचे खड्डॆ.

आज प्रथमच वेताळ हतबल झाला.

त्याचे असे झाले.

पावसाळ्यातील मुंबई नगरीची दशा विक्रमाला सांगुन झाली.
शेवटी वेताळ म्हणाला "माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, नाही गप्प राहिलास तर आज तुज्या डोक्याऐवजी तुझ्या रथाच्या चाकांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील.

 
" सांग मला , मुंबईतल्या प्रत्येक रस्तावर २३८८ खड्डॆ पडले असतांना मनपा आयुक्‍तांनी सर्व १०३८ रस्तावर एकुण २३८८ खड्डॆ पडले आहेत असे का सांगितले असावे ? त्यांच्या समजुतीचा कोठे घोटाळा झाला असावा ? का त्यांना चुकीची माहीती पुरवली गेली असेल ? सांग नाहीतर तुझ्या रथाची चाके !"

विक्रम म्हणाला " बा वेताळा कशाला भय दाखवतोस ? मी काही आज तुला घाबरणार नाहीयं, आधीच माझा रथ या मुंबईतल्या रस्तांवर चालुन चालुन (धावुन नव्हे ) खिळखिळा झाला आहे, त्याचे प्रत्येक भाग न भाग ढिले झालेले आहेत, आता आणखी काय व्हायचं बाकी राहीले आहे ? "

विक्रमा तु बोललास आणि मी हा चाललो उडुन.

7 comments:

चैताली आहेर. said...

tumachi hi shaili khup avadte....!!

HAREKRISHNAJI said...

धन्यवाद चैत्राली. पुर्वी मी अश्या पद्धतीने लिहीत असे

मन कस्तुरी रे.. said...

Where are you? All well?

Gouri said...

बर्‍याच दिवसात काही पोस्ट नाही तुमची ... खूप कामात आहात का? सगळं ठीक आहे ना?

Revati said...

chhan lekh ahe. Google var kahitari shodhtana vat chukun ithe ale pan chuklelya vatevar kahitari surekh vachaila milala.

Asha Joglekar said...

मुंबई च्या नगर पालिका क्रमचार्-यांना तामिळनाडूत नेऊन आणायला हवं .

Anonymous said...

Why dont u write now, please start writing u write very well.