प्रतिकार शक्ती वाढवा, आमचा च्यवनप्राश खा.
महागाईच फ्लु हटवा, आम्हाला मत द्या.
कोणाला काय, कशाचे काय
अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
प्रतिकार शक्ती वाढवा, आमचा च्यवनप्राश खा.
महागाईच फ्लु हटवा, आम्हाला मत द्या.
कोणाला काय, कशाचे काय
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर जा !!
होय बाप्पा.
रात्रीचे १० ते १, जवळजवळ तीन तास आपल्याला एकाच जागी आपल्या भक्तमंडळींनी ताटकळत उभे ठेवले होते, त्यांची हौस भागवण्यासाठी, कर्णॅकर्कश वाद्यांच्या तालावर नाचण्याचे. त्यात परत हा आवाज कमी पडतो म्हणुन मग मोठाले भोंगे.
थकल्याभागल्या जीवास, नाही हो बाप्पा रात्रीच्या वेळी हा कानावर सतत आदळणारा भलामोठाला आवाज आता सहन होत.
बाप्पा, तुम्ही सुद्धा तुमच्या भक्तांपासुन दुसऱ्यांना वाचवण्यास असमर्थ आहात,
आणि पोलीस , त्यांचे तर हात बांधलेले. आणि ते तक्रार करणाऱ्यांचीच उलटतपासणी करण्यात माहीर.
तेव्हा बाप्पा
पण राजाभाऊ तुम्ही काहीही म्हणा अरुण शौरी यांनी जबरदस्त शब्दप्रयोगाचा वापर केला आहे " एलीस इन ब्लंडरलॅड " . ऐकुन तबियत खुष झाली.
याचबरोबर त्यांनी एक खुप चांगला मुद्दा मांडला आहे. ग़ोव्याचे माजी मुख्यंमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या सारख्या नेत्यांना वरती उचला, त्यांना जास्त वाव द्या.
श्री. मनोहर पर्रीकरांसारखे व्यक्तीमत्व राजकारणात दुर्मींळ. अश्याच नेत्यांची आज गरज आहे.
अनेकदा एखादा कलावंत आपल्या परिचयाचा ( प्रत्यक्षात नव्हे ) असतो, पण असे असुन देखिल आपण त्याचे गाणे कधी ऐकलेलेच नाही हे जेव्हा जाणवते, तेव्हा एखादा धक्का बसायचा तो बसतोच.
शुभा मुगदल यांचे गाणे ऐकायला किती वर्षे लागली ? सेंट झेवियर्स कॉलेज मधे " मल्हार के प्रकार " ऐकतांना हे जाणवले.
त्या दिवशी मल्हारचा एक नवा प्रकार ऐकला " श्वेत मल्हार ". त्या आधी त्या " गौड मल्हार " "व तिलक मल्हार" गायल्या.
मजा आली.
या गणेशोत्सावाचे खरे मानकरी आहेत ते मुर्तीकार व त्यांचे सहकारी.
आज मला त्यांची दया आली.
गेले कित्येक महिने अविरत ते याच क्षणासाठी ढोरमेहनत करीत आहेत.
मुर्ती नेण्यासाठी माणसे आली तरी त्यांची मुर्तीवर अजुन शेवटचा हात फिरवायचा बाकी आहे, त्यांची गेले कित्येक दिवस तहानभुक हरपुन , शरीराच्या कमीतकमी गरजांकडे देखिल कानाडोळा करत केलेली २४ तासाची मेहनत देखिल अपुरी पडत आहे. त्यांचे लाख लाख आभार.
बाप्पासमोरील आरस करतांना, दिव्यांची तोरणे लावल्या नंतर, पहिल्या फटक्यात सर्व दिवे पेटण्यासारखे सुख नसावे.
पण हे फार थोड्याच वेळा नशिबी असते. कुठे दिवेच गेलेले असतात तर कोठे वायरच सर्वकाही नीट बघुन बसवल्यानंतर निघालेली असती, मग परत सोडवा, लावा, बदला, त्यात येखादा बल्ब हातुन निसटुन खाली पडुन फुटावा.
संतापाचा पारा वर वर चढत जावु लागतो, त्यात सुचना करणाऱ्यांची भर.
पण हा सारा त्रास केवळ त्या पाहुण्याचे आगमन होईपर्यंत.
येकदा का तो घरी आला आणि बिराजमान झाला कि मग कसे सारे श्रम सार्थकी लागतात.
जर का राजाभाऊंच्या बायकोला कळले की ते आदेशभावजींचा कित्ता गिरवत, त्यांच्या पावलावर पाउल टाकत वहिनींना घेवुन पैठण्याबिठण्या खरेदीस गेले दोन दिवस , जागतीक व्यापार केंद्र, मुंबई येथे वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार प्रायोजीत "सिल्क फॅब" या प्रदर्शनाला जात आहेत, तर त्यांची खैर नाही.
विविध राज्यातुन येथे पारंपारिक सुरेख रेशमी हातमाग साड्या, ड्रेस मटेरियल विकायला कारागीर आले आहेत.
न चुकवण्यासारखे प्रदर्शन.
१८ तारखेपर्यंत आहे