त्या घोळक्यात होते एक सो कॉल्ड कला,नॄत्य समीक्षक, वय वर्षे अवघे "पावुणशे वयमान", खांद्यावरील झोळीत त्यांनी वर्तमानपत्रात लिहीलेल्या लेखांची चार-सहा कात्रणे, ते त्यांचे भांडवल. कदाचीत ते या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असाव्यात सुद्धा. कोण जाणे.
मग त्यांनी आपली ओळख बाईंना करुन दिली, आता वडीलांच्या वयाचे म्हटल्यावर बाईंचे हात हातात धरुन बोलत रहाणे स्वाभाविकच नाही का ? पण बोलणे केवढे ? किती वेळ ? मारुतीच्या शेपटीसारखे लांबलच्चक ,संपता संपत नाही, हात हाती घेतलेला सोडवत नाही. इतर जण ताटकळत उभे आहेत याचे सभ्यगॄहस्थांना भान नाही. नर्तकीची चुळबुळ सुरु झाली, वाट पहाणाऱ्यांत त्यांचा एक कार्यक्रम ठरवण्यासाठी आलेले दोघे जण होते, स्वाभाविक पणे त्यांच्या कडे लक्ष देणे क्रमप्राप्त होते, बुजुर्गांचे कौतुक काही संपण्याच्या मार्गवर नव्हते.
आपला हात अलगद सोडवुन त्या इतरांकडे वळल्या, झाले या समिक्षकांचे माथे बिथरले, ते दोघे बातचीत करुन लगेच निघुन गेल्यानंतर यांनी मॅडमना फायरीग वर फायरींग द्यायला सुरवात केली, तुला काय मॅनर्स वगैरे आहेत की नाही , मी तुझ्याशी बोलत होतो आणि तु खुशाल माझाकडे दुर्लक्ष करुन त्यांना अटेंड करायला गेलीस, या तुझा गुन्हाला क्षमा नाही , तुझे असे धाडस मुळात झालेस कसे , तुझ्यात ही हिम्मत आलीच कुठुन ? ढिशुम्म, ढिशुम्म. नौटंकी सुरु.
मॅडम नी मग हात जोडुन त्यांची माफी मागायला सुरवात केली, गलती हो गयी, अगली बार मुझसे ऐसी भुल कभी नही होगी , मुआफ कीजीयेगा, माफी चाहती हुं !, आता काय करायच म्हाताऱ्या माणसाचा, त्यांचा वयाचा, पांढऱ्या पिकलेल्या केसांचा मान राखायला हवाच ना. नौटंकीचा जबाब ही त्याच भाषेत द्यायला हवा ना.
म्हातारा काय पटायला मागत नव्हता, त्याला जास्तच चेव येत गेला, मग माफी स्विकारता स्विकारता बाईंचे जोडलेले हात गच्च धरले व तिला चक्क जवळ घेतले, मिठीत, राग शांत होईना, मिठी काही सुटेना, मग तिच्या गालाचे चुंबन घेतले,
मग कदाचीत त्यांचा राग शमला असावा.
टुलिप्सच्या बॉगवर खाली लिहीलेले वाचले आणि हा वरील प्रसंग आठवला